मराठवाडा
Umarga Crime News : अनैतिक संबंध, चारित्राच्या संशयावरून महिलेचा खुन; उमरगा पोलिसांनी २४ तासात प्रियकराला केली अटक
Maharashtra Crime : उमरग्यात चारित्र्यावर संशय घेऊन प्रियकराने ४५ वर्षीय माया शिंदे यांचा गळा दाबून खून केला असून आरोपीला २४ तासांत अटक करण्यात आली आहे.
उमरगा : शहरातील भागातील एका मस्जिद समोर, अनैतिक संबंध व चारित्र्याच्या संशयातून एका ४५ वर्षीय महिलेचा गमजाने गळा आवळून खून केल्याचा प्रकार रविवारी (ता.१३) दुपारी साडेबाराच्या सुमारास निर्देशनास आली. माया रमेश शिंदे असे मृत महिलेचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी तिच्या प्रियकराला चोविस तासाच्या आत अटक केली आहे.