बीड: मद्यपी पतीने चक्क पोट फाडून पत्नीचा खून केला. तीन लेकरांची आई पतीच्या रागाचा बळी ठरली. परळी तालुक्यातील डाबी गावात ही घटना शनिवारी (ता. १३) सकाळी उघडकीस आली. शोभा तुकाराम मुंडे (वय ३७) असे मृत महिलेचे नाव आहे..डाबी येथील तुकाराम मुंडे यास दारूचे व्यसन आहे. त्यामुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद व्हायचे. या दांपत्यास दोन मुले व मुलगी अशी अपत्ये आहेत. दोन वर्षांपूर्वीही रागाच्या भरात तुकारामने शोभाच्या डोक्यात दगड घालून जीवघेणा हल्ला केला होता. त्यावेळी शोभाच्या तक्रारीवरून पोलिसांत गुन्हाही नोंद केला होता. मात्र, नातेवाईकांच्या दबावामुळे तिने तो गुन्हा मागे घेतला होता..दरम्यान, शुक्रवारी रात्री रागाच्या भरात तुकारामने पत्नी शोभाचा पोट फाडून क्रूर पद्धतीने खून केला. शनिवारी सकाळी घटना उघडकीस आली तेव्हा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता, तिच्या पोटातील आतडे बाहेर आलेले पाहून ग्रामस्थही हादरले. या घटनेनंतर नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले. हत्येनंतर तुकाराम मुंडे फरारी झाला आहे. घटनास्थळाचा परळी ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती..Pro Kabaddi 12: पवन सेहरावतची हकालपट्टी! तमिळ थलायवाजने कर्णधाराला घरी पाठवण्याचं दिलं स्पष्टीकरण.तपासासाठी पोलिसांचे पथक रवानासंशयित तुकाराम मुंडे फरारी असून त्याचा शोध घेण्यासाठी परळी ग्रामीण पोलिसांनी विशेष पथक रवाना केले आहे. नातेवाइकांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला, तेव्हा पोलिस अधिकाऱ्यांनी संशयिताला लवकरच अटक केली जाईल, असे आश्वासन नातेवाइकांना दिले आहे.दूधवाल्यामुळे उघड झाला प्रकारदररोजप्रमाणे सकाळी आलेल्या दूधवाल्याने हाक मारली. मात्र, बराच वेळ घरातून कोणीही बाहेर आले नाही. त्यामुळे संशय निर्माण झाला. त्याच वेळी घरातील लहान मूल जागे झाले. आईचा मृतदेह पाहून मुलाने आरडाओरडा केला. काही क्षणांतच ग्रामस्थ घटनास्थळी जमा झाले आणि तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.