पाचोड : जिल्हा सत्र न्यायलयाच्या पासष्ट वर्षीय निवृत लिपिकाचे धडावेगळे मुंडके छाटून मृतदेह विहीरीत फेकून दिल्याची हृदयद्रावक घटना चिंचाळा (ता.पैठण) शिवारात शुक्रवारी (ता. नऊ) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. .यासंबंधी अधिक माहिती अशी, नामदेव एकनाथ ब्रम्हराक्षस (वय ६५ वर्षे) रा. चिंचाळा (ता. पैठण) (हल्ली मुकाम छत्रपती संभाजीनगर) हे छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात लिपीक म्हणून नोकरीस होते. ते नुकतेच या सेवेतून निवृत्त झाले होते. त्यांची चिंचाळा (ता.पैठण) शिवारात शेतजमिन गट क्रमांक १२१ मध्ये ५७ गुंठे जमिन होती. शेतात घर बांधण्याच्या इराद्याने ते पत्नीसमवेत मंगळवारी (ता.सहा) छत्रपती संभाजीनगरहुन आपल्या गावी भावाकडे आले होते. दोन दिवस त्यांनी घर बांधण्याची जागा नक्की करून परत छत्रपती संभाजी नगरला जाण्याचा बेत आखला, मात्र त्यांचे सर्व स्वप्न 'स्वप्न'च ठरले..शुक्रवारी (ता.नऊ) पहाटे तीन वाजेपासून ते गायब झाले होते. सकाळी भाऊ व त्यांची पत्नी झोपेतून उठल्यानंतर त्यांना नामदेव ब्रम्हराक्षस बेपत्ता असल्याचे दिसून आल्याने त्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांचे स्वतःच्या शेतातील विहिरीत मुंडके नसलेल्या अवस्थेत मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे पाहवयास मिळाले. समोरील दृश्य पाहून सर्वांनी हंबरडा फोडला. त्यांचे आवाज ऐकून ग्रामस्थ व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी या घटनेची पाचोड पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने मुंडके नसलेले मृतदेह विहीरीबाहेर काढले. विहीरीत पाणी असल्याने मुंडकीचा शोध घेण्यासाठी पोहणाऱ्या व्यक्तिंना घटनास्थळी बोलविण्यात येऊन त्यांच्या मदतीने विहीरीत शोध घेण्यात आला, मात्र विहीरीस अधिकचे पाणी असल्याने मुंडके सापडून आले नाही. .अखेर पाचोड पोलिसांनी छत्रपती संभाजी- नगरहून श्वानपथकाला पाचारण केले. वस्तीपासून ते विहिरीपर्यंत श्वानाने "माग" शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही आक्षेपार्ह पुरावा सापडून आला नाही. मुंडकी शोधण्यासाठी विहीरीचे उशिरापर्यंत पाणी उपसण्याचे काम सुरू होते. या घटनेची माहिती मिळताच पाचोड व विहामांडवा परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. उशिरापर्यंत मुंडकी शोधण्याचे काम सुरू असल्याने मृतदेहाची उत्तरणीय तपासणीचे काम रखडले.सदरील घटनेचे अद्याप रहस्य उलगडले नसून खुन करणाऱ्या व्यक्तीने संबंधीत मयतास रात्री घरातून उलचून केले की सदर व्यक्ती लघुशंकेला बाहेर गेल्यानंतर कुणीतरी पाळत ठेवून त्यांचा खून करून मृतदेह विहीरीत टाकला हे अद्याप गुलदस्त्यात असून पैठणचे उपविभागिय पोलिस अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे यांचेसह पाचोड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन बारकाईने पाहणी केली. लवकरच संबंधीत घटनेतील मारेकऱ्यास जेरबंद करण्यास यश मिळेल असे डॉ. भोरे यांनी सांगितले. यासंबंधी पाचोड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.