Latur Crime: आईचा खून करून मुलाने संपविले जीवन; सांगवीत शेती विक्रीवरून घटना
Latur News: लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात मुलाने शेती विक्रीस आईने नकार दिल्याने तिचा खून करून स्वतःला संपवलं. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
रेणापूर (जि. लातूर) : शेती विक्रीस विरोध करणाऱ्या वृद्ध आईचा खून करून मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगवी (ता. रेणापूर ) येथे गुरुवारी (ता. ७) उघडकीस आली.