धक्कादायक...! नांदेडात अवैध शस्त्रागारावर छापा 

फोटो
फोटो

नांदेड : पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकानी जुना कौठा भागात एका घरावर छापा टाकून अवैध शस्त्रसाठा जप्त केला. ज्यात २७ तलवारी, दोन खंजर व अन्य साहित्य जप्त केले. ही कारवाई बुधवारी (ता. २९) सायंकाळी केली. 

जिल्ह्यातील व शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षीततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने गुन्हेगारांवर प्रतिबंध करण्यासाठी व त्यांच्या कृत्यास आळा बसावा म्हणून पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सुचना दिल्या. 

आरोपी गुलाबसिंग भगवानसिंग बावरी

विशेष पथकाने गुप्त माहिती काढून बुधवारी (ता. २९) सायंकाळी जुना कौठा परिसरातील विकासनगरमध्ये राहणाऱ्या गुलाबसिंग भगवानसिंग बावरी (वय ३७) याच्या घरावर छापा टाकला. यावेळी पोलिसांनी बावरी याच्या घरातून अवैधरित्या तयार केलेल्या २७ तलवारी व दोन खंजर आणि आदी साहित्य जप्त केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या फिर्यादीवरुन गुलाबसिंग बावरी याच्याविरुद्ध नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गुलाबसिंग बावरीला अटक केली आहे. 

दहा लाखाची खंडणी मागणाऱ्यावर गुन्हा  

नांदेड : अहमदपूर (जिल्हा लातूर) येथे मागासवर्गीय मुलीच्या वसतीगृहाचे काम निमयानुसार करा अन्यथा मला दहा लाख रुपये खंडणी द्या. खंडणी दिली नाही तर मी काम होऊ देणार नाही असे म्हणणाऱ्या एकावर इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहराच्या पावडेवाडी नाका परिसरात पंकज शिवभगत (अध्यक्ष, प्रजासत्ताक समाजवादी भारत पक्ष) यांनी अहमदपूर येथे सुरू असलेल्या मागासवर्गीय मुलींच्या वसतीगृहाच्या कामाला भेट दिली. या इमारतीचे काम नियमानुसार होत नसल्याने त्याने संंबंधीत कंत्राटदाराला काम नियमानुसार करा. नसता मला दहा लाख रुपये खंडणी द्या. पैसे नाही दिले तर मी काम होऊ देणार नाही. असे म्हणून त्या कंत्राटदाराला धमकी दिली. हा सर्व प्रकार ता. २८ मार्च २०१९ ते ता. १६ एप्रील २०१९ दरम्यान घडला. मात्र या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. शेवटी खंडणीच्या सतत मागणीला कंटाळून अखेर शासकिय कंत्राटदार मोहम्मद अब्बास मोहम्मद नजीर रा. साईनगर, इतवारा यांनी इतवारा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पंकज शिवभगत याच्याविरुद्ध सोमवारी (ता. २७) जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अरूण नागरे करत आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com