पाचोड - जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय गणवेषामधून शाळेतील शिक्षकाकडून थेट सरपंचाच्या नावाखाली पंधरा हजार रुपयांची टक्केवारी मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, या संबंधी गणवेष पुरवठा करणाऱ्या व्यक्तीसोबत झालेल्या संभाषणाची शिक्षकाची ऑडिओ क्लिप समाज माध्यमावर वरती व्हायरल झाली आहे. संभाषण करणाऱ्या शिक्षकाचे नाव भास्कर गाभूड असे आहे.