esakal | घरपोच जीवनावश्‍यक वस्तू पोचविण्यासाठी पुढे या, लातूरच्या महापौरांचे दुकानदारांना आवाहन

बोलून बातमी शोधा

Latur Municipal Corporation News, Coronavirus

कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात जीवनावश्क वस्तूला सूट देण्यात आली आहे. पण नागरिकांनी बाहेर पडून गर्दी करू नये याचीही काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे शहरातील किराणा दुकानदारांनी किराणा मालाची घरपोच देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.

घरपोच जीवनावश्‍यक वस्तू पोचविण्यासाठी पुढे या, लातूरच्या महापौरांचे दुकानदारांना आवाहन
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर ः कोरोना विषाणुचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात जीवनावश्क वस्तूला सूट देण्यात आली आहे. पण नागरिकांनी बाहेर पडून गर्दी करू नये याचीही काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे शहरातील किराणा दुकानदारांनी किराणा मालाची घरपोच देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे.


शहरातील किराणा, भाजीपाला, फळ, दूध, बेकरी, मांस, खाण्या पिण्याच्या वस्तूंच्या सर्व दुकानदारांनी घरपोच देण्याकरीता पुढाकार घ्यावा. या करिता आपणास ओळखपत्र देण्यात येऊन आपल्या वाहनांना विशेष परवानगी देण्यात येणार आहे. सेवा केवळ शक्यतो आपल्या प्रभाग व आसपासच्या परिसरात घरपोच द्यावी. आपल्या दुकानाच्या नावासह मोबाईल क्रमांक याची यादीसह माहिती द्यावी. आपण ही सुविधा पुरवू शकत असाल व पुरवठा करण्यासाठी आपले वाहन असल्यास या ९१६८६४०७१० या क्रमांकावर संपर्क साधावा. या उपाय योजनेअंतर्गत मोजक्याच व्यावसायिकांना परवानगी देण्यात येणार आहे. तरी संबंधीत दुकानदारांनी आपले नाव, दुकानाचे नाव व पत्ता, मोबाईल, उपलब्ध वस्तू, प्रभाग क्रमांक यासह माहिती द्यावी, असे आवाहन श्री.गोजमगुंडे यांनी केले आहे.

वाचा ः कोरोनामुक्तीच्या संकल्पाने लातूरात नववर्षाचे स्वागत, गुढी घरोघरी उभारली

नाकाबंदीने घेरले लातूर शहराला
लातूर, ता. २४ ः कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आता राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातही १४४ कलम लागू करण्यात आले आहे. शहरातही पोलिसही सतर्क राहत आहेत. यातून शहरात १५ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. शहरात चारही दिशांनी बाहेरून येणाऱ्या वाहनधारकांची कसून चौकशी केली जात आहे; तसेच शहरात देखील विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. एकप्रकारे पोलिसांच्या नाकाबंदीने शहराला घेरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पोलिसांनी नाकाबंदी करून चौकशी सुरू केल्याने विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्याही कमी होत आहे. कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून सर्वच स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. शहरात कोणत्याच ठिकाणी गर्दी होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे.

त्यात राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्ह्यातही १४४ कलम लागू करण्यात आली आहे. पाचपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यावर बंधने आली आहेत. त्यात रस्त्यावर विनाकारण कोणी फिरणार नाही याची काळजी पोलिस घेत आहेत. शहर पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सुमारे पंधरा ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. येथील नांदेड रस्त्यावरील कृषी महाविद्यालय, अंबाजोगाई रस्त्यावर, औसा रस्त्यावर, बारा नंबर पाटी, हत्ते कॉर्नर, दयानंद गेट, आंबेडकर चौक, बसवेश्वर चौक, पोलिस मुख्यालय अशा ठिकाणी ही नाकाबंदी करण्यात आली आहे. या रस्त्यावरून येणाऱ्या वाहनधारकांची पोलिस चौकशी करताना दिसत आहेत.