Guru Pournima Gol Ringan Sohala
Sakal
उमरगा (जि. धाराशिव): उमरगा तालुक्यातील कराळी शिवारातील अध्यात्माचे प्रमुख श्रद्धास्थान असलेल्या 'श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान'च्या पायथ्याशी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून पार पडलेल्या नयनरम्य गोल रिंगण सोहळ्याने हजारो भाविकांचे लक्ष वेधून घेतले. टाळ-मृदंगाचा गजर आणि ' ज्ञानोबा - तुकोबा'च्या जयघोषात पार पडलेल्या या सोहळ्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता.