esakal | श्री संत नामदेव किर्तन महोत्सवास दोनशे दिवस पूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

नर्सीचे संत नामदेव महाराज जयंती

श्री संत नामदेव किर्तन महोत्सवास दोनशे दिवस पूर्ण

sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : तालुक्यातील नर्सी नामदेव येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५० व्या जयंती महोत्सवानिमित्त सुरु असलेल्या किर्तन महोत्सवास गुरुवारी (ता. १०) दोनशे दिवस पूर्ण झाले आहेत.

संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५० व्या जयंतीदिनी ता. २६ नोव्हेंबर २०२० रोजी सुरु झालेल्या अखंड किर्तन महोत्सवास गुरुवारी ( ता. १० ) जून रोजी दोनशे दिवस पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्ताने गुरुवारी संत नामदेव महाराज मंदिरात आनंद उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नर्सी व परिसरातील सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कीर्तन महोत्सव हा संत नामदेव महाराज यांच्या ७५१ व्या जयंती पर्यंत म्हणजेच ता. १७ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अखंडपणे चालू राहणार आहे. त्यानिमित्ताने संत नामदेव संस्थानच्या वतीने येणाऱ्या सर्व भाविकांसाठी अन्नसत्राची व्यवस्था करण्यात आलेली आहे.

हेही वाचा - धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. विष्णुपूरी प्रकल्प सध्या स्थिती 92 टक्के भरले आहे.

दोनशेव्या दिवसानिमित्त विनायक भिसे यांच्या हस्ते विशेष महापूजा पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बी. डी. बांगर, जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुनील पाटील, दादाराव नवघरे, डॉ. रोकडे, संस्थांचे उपाध्यक्ष भिकाजी कीर्तनकार, अन्नछत्र समिती अध्यक्ष भारत महाराज बेंगाळ, सचिव सुभाष हुले, अंबादास गाडे, विश्वस्त रामराव सोळंके, नवसाजी गुगळे, रामेश्‍वर मांडगे, अॅड. रमेश शिंदे, एकनाथ शिंदे यांच्यासह अन्नसत्र समितीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ तसेच नर्सी नामदेव परिसरातील सेवाधारी महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे