esakal | शासकीय कार्यालयांत शुकशुकाट
sakal

बोलून बातमी शोधा

photo

कोरोनाच्या धास्तीने ‘होम टू वर्क’; पाच टक्के कर्मचऱ्यांवर भिस्त, आरोग्य यंत्रणा सज्ज  

शासकीय कार्यालयांत शुकशुकाट

sakal_logo
By
नवनाथ येवले

नांदेड :  कारोना विषणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोमवारी (ता. २३) राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मंगळवारी (ता. ३१) पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. विविध अस्थापना, शासकीय कार्यालयाचा कारभार पाच टक्के मणुष्यबळावर सुरू असल्याने सोमवार (ता. २३) पासुन कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थतीमुळे जिल्हापरिषदेच्या विविध विभागात शुकशुकाट येत आहे. तर दुसरीकडे संचारबंदी लागू करण्यात आल्याने शहरातील रस्ते निर्मनुष्य झाले आहेत. 

जगभरात कोरोना विषणूच्या संसर्गजन्य आजाराची दहशत पसरली आहे. संसर्ग रोखण्यासाठी राज्यात आपत्ती व्यवसथापन कायद्याची आंमलबजावणी करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी जनता कर्फ्यूमध्ये नागरिकांनी सहभाग घेतला. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार राज्यात संंचारबंदी लागू करण्यात आली आहे. संसर्ग रोखण्याच्या उद्देशाने गर्दी टाळण्यासाठी शासकीय कार्यालयामध्येही पाच टक्के मणुष्यबळाचा वापर करण्याच्या सूचाना सोमवारी देण्यात आल्या.

हेही वाचाधक्कादायक : इकडे पोलिस आहेत, उद्या फोन करतो म्हणाल्या अन्...

कार्यालयाकडे कोणी फिरकेना 
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांची कार्यलये निर्मणुष्य दिसून आली. कार्यालयांत नागरिकांसह अधिकारी, कर्मचारीही दिसत नसल्याने कार्यालय ओस पडली आहेत. तर सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. कोरोना व्हायरस हा विषाणू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून जो तो कोरोनापासून बचाव करण्यासाठी काळजी घेत आहे. शासनातर्फे करण्यात येणाऱ्या उपाययोजना तर आहेतच. मात्र, यासाठी प्रत्येकान घ्यावयाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

त्यामुळे (ता. ३१) मार्चपर्यंत लोकांनी आता घरातच थांबणे पसंत केल्याने कार्यलयाकडे कोणी फिरकलेच नाहीत. जिल्हा परिषदेच्या मुख्य द्वारावर अभ्यागतांची चौकशी करून त्यांना आत सोडण्यात आले. 

खबरदारीसाठी सुचनांचे पालन 
कोरोना विषणूचे संक्रमन रोखण्यासाठी शासन निर्देशानुसार मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यात येत आहे. कामानिमीत्त अभ्यंगतांनी कार्यालयात येऊ नये, महत्वाचे काम असल्याने व्हॉट्स अप नंबरवर संवाद साधण्याचे आवाहन नोटीस बोर्डावर डकवण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासकीय कामाजाशिवाय जिल्हा परिषदेत इतर कामे बंद आहेत. दरम्यान, शासन निर्देशानुसार कर्मचारी सोशल मीडियाद्वारे प्रशासकीय कर्तव्य बजावत आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाने अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात येणाऱ्यावर निर्बंध लावले आहेत. 

येथे क्लिक करा -  कसा आसेल महाराष्ट्रात बंद

जबाबदार यंत्रणा सज्ज 
नागरीकांच्या तत्पर आरोग्य सेवेसाठी जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्र, प्रामिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालयातील परिस्थितीचा जिल्हा आरोग्य अधिकारी सातत्याने आढावा घेत आहेत. जिल्हा रुग्णालयातील नियंत्रणकक्षाद्वारे रुग्ण, आरोग्य सेवे बाबत अवश्यकतेनुसार ग्रामीण आरोग्य यंत्रणेला मार्गदर्शक सुचना देण्यात येत आहेत.

कोरोना प्रतिबंधात्मक अभियानांतर्गत गावपातळीवर आंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, शिक्षक, ग्रामसेकवकांचे पथक परप्रांतासह बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरीकांच्या नोंदी घेत आहेत. त्याच बरोबर नागरीकांमध्ये जागृती करण्यात येत आहे.