Maharashtra Security Force: बेलगावच्या शेतकरी पुत्र शुभम मोताळे यांची महाराष्ट्र सुरक्षा बलात निवड

शेतकरी कुटुंबातील शुभम राजे मोताळे यांची महाराष्ट्र सुरक्षा बलात निवड; जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाला मिळाले यश, बेलगावसह परिसरात आनंदाचा जल्लोष
Rural Triumph: Shubham Raje Motale Secures Selection in Maharashtra Security Force

Rural Triumph: Shubham Raje Motale Secures Selection in Maharashtra Security Force

Sakal

Updated on

अशोक चांगले

सुखापुरी : अंबड तालुक्यातील सुखापुरी परिसरातील बेलगाव येथील शेतकरी कुटुंबातील सुपुत्र शुभम राजे सूर्यकांत मोताळे यांची महाराष्ट्र सुरक्षा बल (Maharashtra Security Force - MSF) मध्ये निवड झाल्याने गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर शुभम यांनी हे यश संपादन केले असून त्यांच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com