बंद करा, बंद करा, देशी दारु दुकान बंद करा, कळमनुरीत महिलांचा मोर्चा

संजय कापसे
Wednesday, 20 January 2021

बसस्थानकाजवळील भरवस्तीत असलेल्या देशी दारूच्या दुकानापासुनच काही अंतरावर बंजारा समाजाचे जगदंबा मंदिर, मुस्लिम धर्मियांचे प्रार्थना स्थळ आहे.

कळमनुरी (जिल्हा हिंगोली ) : बंद करा,बंद करा, देशी दारू दुकान बंद करा अशा घोषणा देत  महिला व नागरिकांनी बुधवार (ता. २०) सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्या  पासून मोर्चा काढला  व शहरांमधील देशी दारू दुकान बंद करण्याकरिता प्रशासनाला निवेदन दिले.

याबाबत येथील सामाजिक कार्यकर्ते अजीजखान पठाण यांनी प्रशासनाकडे निवेदन देऊन बसस्थानकाजवळील भरवस्तीत असलेल्या देशी दारूच्या दुकानापासुनच काही अंतरावर बंजारा समाजाचे जगदंबा मंदिर, मुस्लिम धर्मियांचे प्रार्थनास्थळ आहे. दुकानासमोरून येणाऱ्या जाणाऱ्या शाळकरी मुली व महिलांना दारुड्यांचा त्रास होत असतो. या दुकानातून अनधिकृतपणे खेडोपाडी दारूचे बॉक्स विक्री केल्या जात आहे. देशी दारू दुकानाकडून कुठल्याही वेळा पाळल्या जात नाहीत. वेळी- अवेळी दुकान उघडे ठेवून दारूविक्री होत असते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असल्यामुळे या भागातील दुकान बंद करण्याची मागणी केली होती.

दरम्यान बुधवार  येथील सावित्रीबाई फुले पुतळ्यापासून दारूमुक्त संघर्ष समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये अजीजखा पठाण, नगरसेवक आप्पाराव शिंदे, राजू संगेकर, संतोष सारडा, अतुल बुरसे, नामदेव कराळे, दादाराव डुरे, संभाजी सोनुने, सुहास पाटील, ॲड. विश्वनाथ चौधरी शिवराज पाटील, बब्बर पठाण, अयाज पठाण ,सुनील वाढवे, संतोष साखरे, ॲड. अमोल डिग्गीकर, ॲड. विवेक दैठणकर, ॲड. सुनील घोंगडे, इस्माईल गणी, शेख एजाज शेख इब्राहिम, दासराव खिल्लारे, कृष्णकांत शेवाळकर, पिंटू गडदे ,श्वेता जुने, उषा सोनोने, प्रिया चौधरी,दुर्गा चौधरी, सुनीता वाढनकर, वंदना चोधरी, वनिता पाईकराव, आम्रपाली हटकर, बेबी इंगोले, मिराबाई बोधडे ,मुक्ताबाई लांडगे, रोहिणी लांडगे, यास्मिन बेगम रुक्सार बेगम, निलोफर बेगम तबस्सुम बेगम, फरजाना बेगम, लक्ष्मीबाई बलखंडे, अनुसयाबाई भालेराव, संगीता पातोडे, सुजाता बलखंडे,पंचफुला खिल्लारे, संगीता वाढवे, रंजनाबाई धुळे,ज्योती भालेराव, सुमन वाढवे, विलास बेंद्रे , संदीप मोरे, विनायक भोजले, सुमित अलदुर्गे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला व नागरिकांची उपस्थिती होती.

सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून महिला व नागरिकांनी देशी दारूचे दुकान बंद करण्याच्या घोषणा देत हाती फलक घेऊन तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. तहसील कार्यालयात हा मोर्चा पोहोचल्यानंतर कार्यालयाच्या परिसरात मोर्चेकऱ्यांनी देशी दारू दुकान बंद करण्याच्या घोषणा देत हा परिसर दणाणून सोडला.यावेळी महिलांनी नायब तहसीलदार श्रीराम पाचपुते यांच्याकडे देशी दारू दुकान बंद करण्यासंदर्भात निवेदन दिले. यावेळी पोलिस निरीक्षक रणजित भोईटे, उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर, प्रतिभा शेटे, यांच्यासह मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shut down, shut up, close down the liquor store, the women's march in Kalamanuri hingoli news