Sillod Accident: ट्रक-दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील महिला जागीच ठार!

Sambhajinagar News: मृत महिलेच्या पश्चात पती, सासू, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
Sillod Accident: ट्रक-दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील महिला जागीच ठार!
Updated on

Latest Marathwada News: ट्रक दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाली. ही घटना छत्रपती संभाजीनगर-जळगाव राष्ट्रीय महामार्गावरील मंगरूळ फाट्यालगत बुधवारी (ता.२) दुपारी पाऊणच्या सुमारास घडली. उषा गणेश धुमाळ (वय ३४, रा. माणिकनगर, ता. सिल्लोड) असे मृत महिलेचे नाव आहे.

पालोद येथून सिल्लोडकडे येत असलेल्या दुचाकीला (क्रमांक एमएच.20.सीई.9372) अजिंठ्याकडून जालना येथे जाणाऱ्या ट्रकने (क्रमांक जीजे 31 टी 2470) जोराची धडक दिली. यावेळी दुचाकीवरील उषा धुमाळ खाली पडल्या आणि ट्रकच्या चाकाखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

Sillod Accident: ट्रक-दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील महिला जागीच ठार!
Sillod News : रुग्णवाहिकेतच महिलेची प्रसूती; नवजात शिशूसह मातेचा मृत्यू

सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस हवालदार सचिन काळे करित आहेत. मृत महिलेच्या पश्चात पती, सासू, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

Sillod Accident: ट्रक-दुचाकीच्या धडकेत दुचाकीवरील महिला जागीच ठार!
Sillod News : आठवडाभरात ५० जणांना कुत्र्यांनी घेतला चावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com