

Summary
सिल्लोड तालुक्यात नाल्यात सापडलेल्या वृद्धेच्या मृतदेह प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला.
चंद्रकलाबाई साळवे (६५) यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
मैत्रीण अलकाबाई गाडेकर हिने मृत्यूची माहिती लपवली
सिल्लोड तालुक्यातील भवन-पिंपळगाव पेठ रस्त्यावरील नाल्यात सोमवारी (ता. २२) आढळलेल्या वृद्धेच्या मृतदेह प्रकरणाचा उलगडा झाला आहे. दागिन्यांच्या लोभापोटी वृद्धेचा मृत्यू लपवून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे. अलकाबाई देवीदास गाडेकर (रा. पिंप्री, ता. सिल्लोड) असे तिचे नाव आहे.