

Tragic Accident on Sillod-Jalgaon Highway; 15-Year-Old Boy Killed in Speeding Truck Collision at Palod
Sakal
राहुल पारवे
पालोद : सिल्लोड तालुक्यातील पालोद येथील पेट्रोल पंपाजवळ रविवारी (ता.४) सकाळी आठ वाजेच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी अपघात घडला. जळगावच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका १५ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्याचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत.