

Farmers Run from Pillar to Post for Crop Loans; SBI Anvi Branch Demands Unrelated Land Mutation Records
Sakal
राहुल गजानन पारवे
पालोद : पीक कर्जासाठी बँकेत अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना वारंवार कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी हेलपाटे मारावे लागत असल्याची तक्रार सिल्लोड तालुक्यातील अन्वी येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेबाबत समोर आली आहे. पालोद, सारोळा, रहिमाबाद, मंगरूळ, चिंचपूर, चांदापूर, लिहाखेडी, असाडी यासह परिसरातील शेतकरी या शाखेत पीक कर्जासाठी येत आहेत. मात्र, कर्ज प्रक्रियेदरम्यान संबंधित जमिनीशी थेट संबंध नसलेल्या व्यक्तींचे फेरफार उतारे मागविले जात असल्याचा आरोप काही शेतकऱ्यांनी केला आहे.