

Kolhapur-Style Dam Repair on Purna River in Sillod Delayed; Water Shortage Looms Large
Sakal
सुनिल पांढरे
भराडी : सिल्लोड तालुक्यातील पिरोळा, डोईफोडा, म्हसला बुद्रुक, म्हसला खुर्द, टाकळी खुर्द, सोनप्पावाडी, बोरगाव बाजार व बोरगाव सारवणी परिसरासाठी महत्त्वाच्या पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती मागील वर्षापासून रखडली आहे. बंधाऱ्याची दुरवस्था असल्याने पावसाळ्यात नदीला आलेले पाणी अडविण्याऐवजी मोठ्या प्रमाणात वाहून जात आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाणीसाठा वाढला नसून नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या विहिरींचीही पाणीपातळी कमी होत आहे.