esakal | जमशेदजी टाटा यांच्याबद्दलच्या या दहा गोष्टी माहिती हव्यातच
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad news

गुजरातच्या नवसारी या छोटया गावामध्ये १८३९ साली पारसी कुटुंबात त्याचा जन्म झाला. आज ३ मार्च हा त्यांचा जन्मदिन. त्यांच्याबद्दलच्या या दहा गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात... 

जमशेदजी टाटा यांच्याबद्दलच्या या दहा गोष्टी माहिती हव्यातच

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भारतीय उद्योगाचे जनक म्हणून ओळखले जाणारे महान उद्योगपती सर जमशेदजी नुसीरवानजी टाटा हे भारताचे पहिले उद्योगपती होते. त्यांनी भारतातील सर्वात मोठ्या टाटा ग्रुप या मिश्र उद्योगसमूहाची स्थापना केली. गुजरातच्या नवसारी या छोटया गावामध्ये १८३९ साली पारसी कुटुंबात त्याचा जन्म झाला. आज ३ मार्च हा त्यांचा जन्मदिन. त्यांच्याबद्दलच्या या दहा गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात... 

  • जमशेदजी टाटा यांनी मुंबईत येऊन वयाच्या १४व्या वर्षीपासूनच एका छोटया व्यापारातून आपल्या कारकीर्दीची सुरवात केली. त्याचवेळी एलफिन्स्टन कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांची बुद्धिमत्ता आणि हुशारी पाहून कॉलेजने त्यांची पूर्ण फी त्यांना परत केली होती. 
  • वयाच्या १६ व्या वर्षी त्यांचे १० वर्षांच्या हीराबाई दबू यांच्याशी लग्न लावण्यात आले. १८५८ मध्ये पदवीधर होऊन वडिलांच्या व्यापारी संस्थेत सह्भागी झाले. त्यावेळी इंग्रज सरकारने १८५७चा उठाव मोडून काढला होता. टाटांनी अशा परिस्थितीतही व्यापारातच कामगिरी करण्याचा निर्णय घेतला. 

वाचा - गरिबांच्या तोंडचा हिरावला घास...

  • १८५९ मध्ये ते हॉंगकॉंंगला गेले. वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी पुढच्या चार वर्षात तिथे टाटा ग्रुप ऑफ कंपनीचे कार्यालय सुरु केले. टाटा कंपनीचा हळूहळू आशियात विस्तार करणारे ते पाऊल ठरले. आणि १८६३ पर्यंत जपान आणि चीनमध्येही कंपनीच्या शाखा सुरू झाल्या आणि ते युरोप यात्रेवर गेले. 
  • लंडनमध्ये त्यांनी भारतीय बँक स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पण त्यात त्यांना यश आले नाही. आशियामध्येही टाटा ग्रुपला मोठे नुकसान सहन करावे लागले. नंतर तिशीत येईपर्यंत जमशेदजींनी वडिलांसोबतच काम केले. 
  • १८६८मध्ये त्यांनी एक व्यापारी कंपनी सुरु केली. कॉटन मिल व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला, तेव्हा लंडनमधील गिरण्या पाहून त्यांनी फक्त कापसाचा व्यापार न करता उत्पादनक्षेत्रात शिरावे, असा विचार केला होता. 

क्लिक करा - अतिशय घृणास्पद काम झाले हे तर

  • त्यांनी १८७४ मध्ये नागपूरला मिल स्थापन केली. त्यात त्यांना मोठा नफा मिळाला. व्हिक्टोरिया राणीच्या नावावरून त्यांनी आपल्या मिलचे नाव महारानी मिल ठेवले. नागपुरची ही मिल त्यांनी मोठ्या किमतीला विकली.
  • जमशेदजींनी ‘अलेक्झांड्रा’ आणि १८७७ मध्ये नागपूरला ‘एम्प्रेस मिल’ सुरू केली. या दोन गिरण्यांच्या अनुभवावरच मुंबईत ‘स्वदेशी मिल’, तर अहमदाबादला ‘अॅडव्हान्स मिल’ सुरू केली आणि उत्तम चालवली. 
  • पोलाद उद्योगात उतरण्याचे त्यांचे स्वप्न होते. १८८२ मध्ये त्यांनी कारखाना काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मयूरगंज संस्थानात लोखंड व कोळशाचे साठे मिळाले, म्हणून त्यांनी तिथेच कारखाना काढण्याचं ठरवलं. त्या काळी त्यांनी २ कोटी ३२ लाख रुपयांचं भांडवल ‘शेअर्स’ विकून मिळवलं. पण दुर्दैवानं ते लोखंडाची निर्मिती पाहण्यासाठी हयात राहिले नाहीत. 

हेही वाचा - गैरव्यवहारातील छुपे रुस्तुम

  • कारखाना स्थापन केला. त्यांच्या योगदानाने आणि प्रेरणेने मोटारी, रसायने, दैनंदिन गरजेच्या वस्तू, कापड, यंत्रसामग्री, इलेक्ट्रॉनिक्स, दळणवळण अशा अनेक क्षेत्रांत टाटा समूहाचे कारखाने उभे राहिले. 
  • ३ डिसेंबर १९०३ मध्ये त्यांनी मुंबईत समुद्रकिनारी ताज महल हॉटेलची स्थापना केली. त्यावेळी भारतात स्वतःची वीज असणारं ते एकमेव हॉटेल होतं. १९ मे १९०४ला त्यांचे निधन झाले. तोपर्यंत भारतीय उद्योगजगताचे पितामह म्हणून ते जगभर विख्यात झाले होते.