Video : घरात बसून लढाई जिंकायची : खासदार जाधव

गणेश पांडे
गुरुवार, 26 मार्च 2020

व्हिडिओद्वारे केले आवाहन 

परभणी : कोरोना विषाणूपासून स्वतःला वाचायचे असेल तर केंद्र सरकार व राज्य सरकारने दिलेल्या नियमाचे काटेकोर पालन करावे लागेल. आपण काही दिवस घरात बसून राहिलो तर नक्कीच आपण हा लढा जिंकू, असा विश्वास परभणीचे खासदार संजय जाधव यांनी बुधवारी (ता.२५) व्हिडिओद्वारे व्यक्त केला.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन व जिल्हा प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन परभणी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांनी करावे, असे आवाहन खासदार संजय जाधव यांनी केले आहे. या संदर्भात खासदार संजय जाधव यांनी स्वता एक व्हिडिओ तयार करून सांगितले की, कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.

हेही वाचा - बॅंक कर्मचाऱ्यांना मिळतो पोलिसांचा ‘प्रसाद’ !

रुमालाचा वापर करावा 
परभणी शहरातील गावातील मंदीरे, धार्मिक स्थळे, देवस्थान या ठिकाणी जास्त व्यक्तीने एकत्र येऊ नये पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येणार नाहीत याची सर्वांनी दक्षता घ्यावी. शक्यतो अत्यावश्यक काम सोडून बाहेर पडू नये. प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात ८ ते १० वेळा  साबणाने स्वच्छ हात धुवावेत, शक्यतो डोळे, चेहऱ्याला हात लावणे टाळावे, हस्तांदोलना ऐवजी दुरुन नमस्कार करावा. शिंकताना रुमालाचा वापर करावा, असेही खासदार संजय जाधव यांनी सांगितले.

हेही वाचा...
मोंढ्यात पहिल्यांदाच शुकशुकाट
परभणी :
जमावबंदी आदेशासह सर्व अस्थापना बंदचे आदेश असल्याने येथील बाजार समितीमधील सर्व व्यवहार बंद झाले आहेत. त्यामुळे मोंढ्यात शुकशुकाट पसरला होता.‘कोरोना’ विषाणूमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. अनेक शासकीय कार्यालयातदेखील प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच सर्व खासगी अस्थापना, कार्यालये बंद झाली आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानेदेखील बंद आहेत. त्यामध्ये बाजार समितीमधील व्यवहारदेखील बंद झाले आहेत. येथील मोंढा नेहमी गजबजलेला असतो. सर्वात मोठी बाजार समिती असल्याने दररोज मोठी वर्दळ असते. मात्र, बाजार समिती बंद असल्याने शुकशुकाट पसरला होता. शेतमालाचे खरेदी-विक्रीचे व्यवहारदेखील बंद होते. तसेच खत, बियाणे, औषधींची दुकानेदेखील बंद राहिली. त्यासोबतच अन्य वस्तूंच्या दुकानांनादेखील टाळे होते.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sitting in the house to win the battle: MP Jadhav