बॅंक कर्मचाऱ्यांना मिळतो पोलिसांचा ‘प्रसाद’ !

गणेश पांडे
गुरुवार, 26 मार्च 2020

बॅंकेतील कर्मचाऱ्यांना पोलिस प्रशासनाच्यावतीने पासेस देण्याची मागणी 
 

परभणी : कोरोना विषाणु प्रादुर्भाव थांबविण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्यातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतू या संचारबंदी दरम्यान, बॅंक सेवा अत्यावश्यक सेवेत धरली असली तरी बॅंक कर्मचाऱ्या एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात किंवा बॅंक कार्यालयापर्यंत पोहचण्यासाठी त्रास होत आहे. अश्या परिस्थितीत बॅंकेतील कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्यावतीने पासेस देण्यात यावेत, अशी मागणी बॅंक कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

देशात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यांला नियंत्रणात आणण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. देशाचे आर्थिक वर्ष देखील केंद्रीय अर्थमंत्र्यांनी पुढे ढकलले आहे. परंतू अश्या परिस्थितीत बॅंकाना त्यांच्या आर्थिक वर्षासंदर्भात कोणतेच लेखी आदेश मिळालेले नाही असे बॅंक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बॅंक कर्मचाऱ्यांना घराबाहेर पडतांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. गळ्यात बॅंकेचे आयकार्ड असतांनादेखील पोलिसांकडून अनेक बॅंक कर्मचाऱ्यांना फटके बसल्याच्या घटना घडल्या आहेत. 

हेही वाचा -... तर परभणी शहराला मिळेल आठ दिवसाआड पाणी
पोलिसांकडून लाठीचा प्रसाद
जोपर्यंत मी बॅंकेचा कर्मचारी आहे असे सांगतो तोपर्यंत एक दोन फटके त्याला बसले जातात अश्या व्यथा ही बॅंक कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत. अनेक बॅंक कर्मचारी हे जिल्ह्याच्या ठिकाणी वास्तव्य करतात. त्यांच्या बॅंका या एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी असतात. त्यात ट्रॅव्हलींग बंद असल्याने कर्मचाऱ्यांना स्वताच्या मोटारसायकलवरून तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे रस्त्यावर असणाऱ्या पोलिसांकडून एखाद्यावेळी चुकून लाठीचा प्रसाद खावा लागत आहे.

हेही वाचा व पहा - Video : कर्तव्यावरील महिला कर्मचाऱ्यालाच महिला पोलिसांचा दंडुका

जिल्हा प्रशासनाकडून पासेस द्यावेत
बॅंक कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने स्वताचे पासेस द्यावेत. जेने करून बॅंक कर्मचाऱ्यांना संचारबंदीच्या काळात बॅंकेत जाणे सोपे होईल. त्याच बरोबर आम्ही एका वेळी पाच व्यक्तींना बॅंकेत प्रवेश देतो आहोत. परंतू  बॅंकेच्या बाहेर लोकांची गर्दी एकत्र जमत आहे. ते घातक आहे. लोकांनी स्वता सोशल डिस्टसिंग ठेवूनच रहावे.
- गिरीश भगूरकर, विभागीय व्यवस्थापक, बॅंक ऑफ महाराष्ट्र

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bank employees get 'Prasad' of police!