esakal | जालन्यात शस्त्रधारी गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्‍या 
sakal

बोलून बातमी शोधा

जालना : पकडण्यात आलेल्या संशयितांना घेऊन जाताना पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर व पोलिस कर्मचारी.

स्थानिक गुन्हे शाखेसह ठाणे शहर पोलिसांच्या पथकाची कारवाई : पावणेचार लाखांचा मुद्देमाल ताब्यात 

जालन्यात शस्त्रधारी गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्‍या 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना - ठाणे शहर पोलिस; तसेच जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहरातील बसस्थानक परिसरात रविवारी (ता. एक) पहाटे सहा शस्त्रास्त्रधारी गुन्हेगांराच्या मुसक्‍या आवळल्या. या कारवाईत दोन गावठी पिस्तूल, धारदार खंजिरासह तीन लाख 88 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 

जालन्याच्या बसस्थानक परिसरातील त्रिवेणी लॉज परिसरात ठाणे व जालना शहराच्या पोलिस पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. यात तिघांना लॉजमध्ये तर तीनजणांना वाहनासह पळून जाताना पाठलाग करून पोलिसांनी पकडले.

पकडलेल्या संशयितांमध्ये श्रीकांत ऋषीकुमार ताडेपकर (रा. खरपुडी रोड), रवी योसेफ कांबळे (रा. शकुंतलानगर, ह.मु. मिशन हॉस्पिटल परिसर), सुशांत ऊर्फ मुन्ना राजू भुरे (कानडी मोहल्ला), विशाल जगदीश कीर्तिशाही (रा. बॅंक कॉलनी, रेल्वेस्थानक परिसर), अमरसिंग शिवसिंग सूर्यवंशी (रा. कसबा, जुना जालना), सुजित शुभ्रमणी श्रीसुंदर (रा. राखीव दल क्‍वॉर्टर) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे सुजित श्रीसुंदर हा जालना येथे राज्य राखीव पोलिस दलामध्ये कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

संशयितांपैकी काही जणांवर खंडणी, खून, जबरी चोरीसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याविरोधात सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

loading image
go to top