esakal | परभणीत सहा मृत्यू, ११५ पॉझिटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

corona

परभणी जिल्ह्यात रविवारी (ता.१३) सहा कोरोना बाधितांचा मृत्यू झाला तर ११५ जण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. 

परभणीत सहा मृत्यू, ११५ पॉझिटिव्ह 

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः जिल्ह्यात रविवारी (ता.१३) सहा कोरोना बाधितांचा मृत्यू झाला तर ११५ जण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. तसेच  एकूण बाधित संख्या तीन हजार ९९९ झाली तर एकूण बरे झालेले रुग्ण दोन हजार ९८७ इतके असून सध्या ८५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १५३ जणांचा मृत्यु झाला आहे. 


परभणी शहरात १९ जण पॉझिटिव्ह 
परभणी शहर महापालिकेच्या वतीने रविवारी (ता.१३) शहरातील चार केंद्र, सात खासगी रुग्णालयांत व तीन प्रभाग समितींतर्फे १०६ नागरिकांची रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे तपासणी करण्यात आली. यात ८७ जण निगेटिव्ह तर १९ जण पॉझिटिव्ह आढळले. सिटी क्लब येथे पाचजणांची तपासणी केली. तेथे दोन पॉझिटिव्ह सापडले. जागृती मंगल कार्यालयात २० जणांची तपासणी केली. बालविद्या मंदिरात १९ जणांची तपासणी करण्यात आली. चारजण पॉझिटिव्ह सापडले. प्रभाग समिती ‘अ’तर्फे एकाजणाची तपासणी केली. तेथे एक पॉझिटिव्ह सापडला. प्रभाग समिती ‘ब’तर्फे तीनजणांची तपासणी केली. प्रभाग समिती ‘क’तर्फे १२ जणांची तपासणी करण्यात आली. चारजण पॉझि

हेही वाचा - कारच्या धडकेत महिला शेतकरी गंभीर जखमी, चालक फरार -

रॅपिड ॲंटिजेन टेस्ट केंद्रावर अनियमितता कायम 
परभणी : महापालिकेचे आता १६ पैकी चारच रॅपिड ॲंटिजेन टेस्ट केंद्र सुरू आहेत. तीही आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे तास- दोन तास असाच सुरू राहत आहेत. प्रभाग समित्यांमध्ये फिरणाऱ्या मोबाईल पथकांना देखील फारसा प्रतिसाद मिळत नसून, नागरिकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. भीतीमुळे अनेक नागरिक टेस्ट करण्यासाठी धजावत नसून, त्यांच्या मनातील भीती आरोग्य विभागाने दूर करणे गरजेचे आहे. महापालिकेची आता चारच रॅपिड ॲंटिजेन टेस्ट केंद्र सुरू असून, येथेही अनियमितता कायम आहे. बाल विद्यामंदिर इलेक्ट्रिक केंद्र दुपारी दोनपर्यंत सुरू झाले नव्हते. येथे तपासणीसाठी ट्यूबचा तुटवडा झाल्याची माहिती आहे, तर मौलाना अबुल कलाम आजाद वाचनालयातील सेंटर बंदच राहिले. सिटी क्लब केंद्रदेखील लवकरच बंद करण्यात आले, तर जागृती मंगल कार्यालयातील केंद्र कसेबसे सुरू होते.

हेही वाचा - उस्मानाबाद जिल्ह्यात २४९ जणांना कोरोना, सात रुग्णांचा मृत्यू

परभणी जिल्हा 
एकूण बाधित - तीन हजार ९९९ 
आजचे बाधित - ११५
आजचे मृत्यु - सहा
एकूण बरे - दोन हजार ९८७
उपचार सुरु असलेले - ८५९ 
एकूण मृत्यु - १५३

 

संपादन ः राजन मंगरुळकर

loading image
go to top