esakal | उत्पादन शुल्कने पकडली सहा लाखाची दारु
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

अवैध देशी, हातभट्टी, सिंदी, ताडी, विदेशी व पराराज्यातील मद्य विक्री करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून धडक कारवाई सुरू केली आहे. तीन दिवसात या पथकांनी तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत १४ जणांना अटक करुन त्यांच्याकडून देशी, हातभट्टी, रसायनसह दुचाकी असा नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. 

उत्पादन शुल्कने पकडली सहा लाखाची दारु

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये राज्य उत्पादन शुल्कने आपल्या भरारी व विशेष पथकाद्वारे जिल्हाभरात अवैध देशी, हातभट्टी, सिंदी, ताडी, विदेशी व पराराज्यातील मद्य विक्री करणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून धडक कारवाई सुरू केली आहे. तीन दिवसात या पथकांनी तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत १४ जणांना अटक करुन त्यांच्याकडून देशी, हातभट्टी, रसायनसह दुचाकी असा नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. 

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशाभरासह जिल्ह्यात लॉकडाऊन व संचारबंदी सुरू आहे. मात्र या संचारबंदीचे आदेश धुडकावत काही अवैध दारु विक्री करणारे मात्र मोकाट आपला अवैध धंदा करत आहेत. अशा धंद्यावाल्यांविरुद्ध कडक कारवाई व्हावी यासाठी राज्य उत्पादन शुल्कचे जिल्हा अधीक्षक निलेश सांगडे यांनी आपल्या भरारी पथकंंसह अन्य यंत्रणेला सतर्क केले. कुठल्याही परिस्थीतीत अवैध दारु मिळणार नाही याची खबरदारी घेतली असून अशा चोरीच्या मार्गाने विकणाऱ्यांवर करडी नजर ठेवून आहेत. 

हेही वाचा वर्तमानपत्रेच आहे समाजमनाचे खरे ‘प्रतिबिंब’

कारवाईमध्ये पथकानी नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त 

बुधवार, गुरूवार आणि शुक्रवार या तीन दिवस संतत केलेल्या कारवाईमध्ये पथकानी नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त करून १४ जणांना अटक केली. विशेष मोहिमेअंतर्गत चिकाळा तांडा (ता. मुदखेड) परिसरात केलेल्या कारवाईत १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यावेळी पथकाला दोन आरोपी सापडले मात्र बाकीचे आपला मद्याचा मुद्देमाल सोडून पसार झाले. या कारवाईत १२ हजार ८०० लीटर रसायन व हातभट्टी दारु असा तीन लाख २४ हजार २५० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. 
दुसऱ्या कारवाईत तीन लाख ३६ हजार ३३२ तर तिसऱ्या कारवाईत दोन लाख १४ हजार ६०० रुपयाचामुद्देमाल जप्त केला.

येथे क्लिक करा - Video - नांदेड महापालिकेतर्फे निराधार, गरजूंसाठी मदतीचा हात
 
यांनी घेतले परिश्रम 

सदर कार्यवाही मध्ये निरीक्षक एस. एस. खंडेराय, भरारी पथकाचे निरीक्षक पी. ए. मुळे, निरीक्षक एस. एम. बोदमवाड, निरीक्षक आर. एस. कोतवाल, दुय्यम निरीक्षक भगवान मंडलवार, टी. बी. शेख, पी. जी. कदम, पी. बी. टकले, वाय. एस. लोळे, व्ही. बी. मोहाळे, ए. के. शिंदे, के. के. किरतवाड, व्ही. टी. खील्लारे, के. आर. वाघमारे, मो. रफी, जवान श्री. भालेराव, श्री. नांदुसेकर, श्री. नागमवाड, श्री. नंदगावे, श्री. फाळके, श्री. जाधव, श्री.  राठोड, सुरनर, नारखेडे, सदावर्ते, भोकरे, इंगोले, बोधमवाड बालाजी पवार, खतीब व महिला जवान डी.एस.टेंभुर्णे, श्रीमती कांबळे यांचा समावेश होता.