esakal | वर्तमानपत्रेच आहे समाजमनाचे खरे ‘प्रतिबिंब’
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून देश लॉकडाऊन करण्यात आला. या काळामध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी वर्तमानपत्र घेऊन प्रत्येकाने सवय लावून घेतली पाहिजे. कारण आपल्या व्यक्तीमत्वाला हवे तसे पैलू पाडण्यासाठी चालून आलेली ही संधी आहे, असा विचार प्रत्येकाने करून आपण घरातच बसून वर्तमानपत्र वाचले तर मनातील असंख्य प्रश्नांची उत्तरे सहज मिळू शकतील.

वर्तमानपत्रेच आहे समाजमनाचे खरे ‘प्रतिबिंब’

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : वृत्तपत्रे हे सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, कामगार तथा कष्टकरी अशा सर्वच घटकांसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते. शिवाय समाजातील ज्वलंत प्रश्‍नांना वाचा फोडण्याचेही महत्त्वाचे काम वर्तमानपत्रे करत असतात. म्हणूनच वर्तमानपत्र हे समाजमनाचे खरे प्रतिबिंब आहे, असे मत ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. हंसराज वैद्य यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले.

वृत्तपत्र हे वाचकांचा बौद्धिक व मानसिक, सर्वांगीण विकास घडवून संवेदनशील समाजमन तयार करते. त्यामुळे वृत्तपत्र हे मानवी जीवनाचा एक अविभाज्य तथा आवश्‍यक घटकच होऊन बसला आहे. वृत्तपत्र नियमित वाचण्याने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक, भौगोलिक अशा विविध क्षेत्रांमध्ये काय घडामोडी चालू आहे, याची इत्थंभूत माहिती मिळते. शिवाय त्याचा संग्रहदेखील करता येतो.

हेही वाचा - अमेरिकेतील क्रांती पाटील यांनाही वाटतेय मराठवाड्याची काळजी...

वृत्तपत्रे विश्‍वासू आधार
वर्तमानपत्रे लोक मनाला उभारीदेण्याचे कार्य करू शकतील. दृश्‍य माध्यमांचा मनोरंजन हा प्रधान हेतू राहत आला आहे. न्याय, अन्यायाचा त्यांच्याशी संबंध कधी आलाच नाही. अशा संभ्रमावस्थेत वर्तमानपत्र घेऊन वाचणे हा मन स्थीर ठेवण्याचा सर्वात चांगला उपाय आहे. वर्तमानपत्रे केवळ घटना वर्णीत नसतात तर त्या घटनेच्या कारणमीमांसा आणि वास्तवाचे विश्‍लेषण अत्यंत वास्तववादी करतात. म्हणून लोकांना वृत्तपत्रे विश्‍वासू आधार वाटतात. वाचकांची करंगळी धरून वृत्तपत्रे वाचकांना प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातात. लोकांना घरातील वडीलधाऱ्या माणसासारखाच या वर्तमानपत्रांचा आधार वाटतो.

येथे क्लिक करा - coronavirus - देश लॉकडाऊन न करताही स्वयंशिस्तीने कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी..

घरात बसूनच मिळते इत्थंभूत माहिती
सद्यस्थितीत इलेक्ट्रॉनिक माध्यम हे कितीही गतिमान झालेले असले तरी तपशिलाच्या बाबतीत मात्र खूपच तोकडे आहे. कारण कोणी, का, कसे व केव्हा अशा सर्व प्रश्र्नांची समाधानकारक उत्तरे देण्यासाठीचा वेळ या माध्यमांकडे नसतो. मात्र, वर्तमानपत्राचे असे नसते. वाचकांच्या सर्व शंकांचे समाधान होईल अशाप्रकारची इत्थंभूत माहिती वर्तमानपत्राच्या बातमी असते. सर्वात जमेची बाजू म्हणजे बातमी देताना विश्‍वासार्हतेला कुठेही तडा जाऊ नये, म्हणून विशेष काळजी घेतली जाते. आज कोरोनाच्या महाभयंकर संकटात जग, देश, राज्य, जिल्हा आणि गाव-परिसरातील घडामोडीया वर्तमानपत्रांतूनच घरबसल्या आपल्याला कळतात. 

हे देखील वाचाच - ज्योतिषी म्हणतात, या तारखेला होईल भारत कोरोनामुक्त...

समाजमन घडविणारे माध्यम 
दिवसेंदिवस पाश्‍चात्य संस्कृती समाजात रुजत चालल्यामुळे आपली जीवनशैलीच बदलून गेली आहे. परिणामी, विविध आजारांना, व्याधींना आपल्याला आज समोरे जावे लागत आहे. आज प्रसिद्धी माध्यमे अनेक प्रकारची आलेली आहेत. परंतु, वर्तमानपत्राने आपले अस्तित्व आजही टिकवून ठेवले आहे. कारण, वृत्तपत्र म्हणजे केवळ बातम्या किंवा ताज्या घडामोडींचाच वास्तूपाठ नसून संपूर्ण मानव जीवनाचे कल्याण आणि समाजमनांसाठी उपयुक्त माहितीचे भांडार आहे.