अजमेर उर्ससाठी सहा विशेष रेल्वे- दमरे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

अजमेर येथील उरसास (ऊर्स) जाण्याकरिता दक्षिण मध्य रेल्वे सहा विशेष रेल्वे गाड्या चालवीत आहे.

नांदेड : अजमेर येथील उरसास (ऊर्स) जाण्याकरिता दक्षिण मध्य रेल्वे सहा विशेष रेल्वे गाड्या चालवीत आहे. असे दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने प्रसिद्धीपत्राकाद्वारे कळविले आहे. 
 
नांदेड- अजमेर- मदार- अजमेर- नांदेड विशेष गाडी :
गाडी संख्या ०७६४१ नांदेड ते मदार ही विशेष गाडी ता. २८ फेब्रुवारी रोजी नांदेड येथून सायंकाळी चार  वाजता सुटेल आणि परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, भोपाल, रतलाम, अजमेरमार्गे मदार जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी ता. २९ फेब्रुवारीला रात्री ११. ३५  वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी संख्या ०७६४२ अजमेर ते नांदेड विशेष गाडी ता. चार मार्च रोजी रात्री २१. २५  वाजता मदार जंक्शन येथून सुटेल आणि नांदेड येथे ता. पाच मार्च रोजी सकाळी सात वाजता पोहोचेल.  या गाडीला एकूण २० डब्बे आहेत.

हेही वाचा -  इथे मरणाचेही भय वाटे...

गाडी संख्या ०७१२९/ ०७१३० काचीगुडा - अजमेर- काचीगुडा  :
ही गाडी काचीगुडा येथून ता. २७ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता निघेल आणि नांदेडला ता. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी पाच वाजता पोहचुन पुढे बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला, भोपाल, रतलाम मार्गे अजमेर येथे ता. २९ फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी संख्या ०७१३० अजमेर येथून ता. चार मार्च रोजी सायंकाळी अजमेर येथून १९. ४५ वाजता सुटेल आणि ता. सहा मार्च रोजी काचीगुडा येथे सव्वातीन वाजता पोहोचेल. या गाडीस २२  डब्बे असतील.

गाडी संख्या ०७१२५ - ०७१२६ हैदराबाद - अजमेर – हैदराबाद:
गाडी संख्या ०७१२५ हैदराबाद ते अजमेर एक्सप्रेस हैदराबाद येथून ता. २७ फेब्रुवारी रोजी रात्री १९. ५० वाजता निघेल आणि नांदेड (मध्य रात्री एक वाजता), हिंगोली, अकोला मार्गे अजमेर येथे ता. २९ फेब्रुवारी रोजी सकाळी चार वाजता पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी संख्या ०७१२६ अजमेर ते हैदराबाद ही गाडी अजमेर येथून ता. तीन मार्च रोजी रात्री २३. ३५ वाजता निघेल आणि उज्जैन, खांडवा, अकोला, हिंगोली, नांदेड मार्गे हैदराबाद येथे ता. पाच मार्चला सकाळी दहा वाजता पोहोचेल. या गाडीस १८ डब्बे असतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six Special Trains - Trains for Ajmer Urs scr, nanded news.