‘या’ ही सागवान तस्करीत पुढे 

file photo
file photo

नांदेड: राज्याच्या तेलंगणा सिमेवरील किनवट, माहूर तालुक्यातील जंगलात सागवान तस्करी सर्वश्रुत आहे. सागवान तस्कारी प्रकरणी वनविभाग, वनमंडळाने विविध सागवान तस्कारांवर कारवाया केल्या आहेत. यामध्ये अधिक तर पुरुषांचा समावेश होता. मात्र, सोमवारी (ता.३०) वनमंडळाच्या पिंपळगाव बीटमधील कक्ष क्रमांक १८५ व १८६ मध्ये सागवानाची तस्कारी करताना चक्क तीन महिलांना रंगेहाथ पकडल्याने या भागातील सागवान तस्करीमध्ये महिलांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. 


किनवट वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी के.जी.गायकवाड हे वनरक्षकासह अन्य सकाहरी कर्मचाऱ्यांसाेबत सोमवारी (ता.३०) पिंपळागाव परिमंडळामध्ये सामूहिक गस्त घालत असतांना पिंपळगाव (ता.किनवट) बीटमधील कक्ष क्रमांक १८५ व १८६ मध्ये तीन महिला सागवानची उभी जीवंत झाडे करवतीने कापत होत्या. यापैकी दोन झाडे तोडून त्याचे चोरीच्या उद्देशाने चार पाट तयार केले. त्यानंतर तिसऱ्या झाडाची कत्तल करत असताना शमीना शमशुद्दीन शेख (वय ३० वर्ष ), मुन्नाबी अमर शेख (वय ५८ वर्षे) व सायराबी आदम शेख (वय ४३ वर्ष) या तिन महिलांना वन परिमंडळ अधिकारी के.जी. गायकवाड व त्यांच्या पथकाने रंगेहात पकडले.

तस्कर महिलांच्या विरोधात गुन्हा
घटनास्थाळावर तोडलेल्या सागवानाच्या झाडांचे काही अवशेष मिळवून आल्याने तस्कर महिलांची कसुन चौकशी केली असता त्यांच्याकडून झाडाची कत्तल करण्यासाठी करवत व कुऱ्हाडी जप्त केल्या. जागेवर जप्त करण्यात आलेले सागी कटसाइज लाकूड ०.१५९ घनमीटर असून, बाजारभावा प्रमाणे त्याची किंमत सात हजार ४२७ रुपये होते. या शिवाय झाडांची एकून नुकसानीची किंमत ३१ हजार ३०१ रुपये आहे. शमीना शमशुद्दीन शेख, मुन्नाबी अमरशेख व शेख आदम यांच्या विरोधात वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तस्कर महिलांची सुटका 
प्रशासन ज्या वेळेस पाचारण करले त्यावेळेस हजर राहून प्रशासनला कारवाई संदर्भात सहकार्य करण्याच्या अटी, शर्थीवर वैयक्तिक मुद्रांकाच्या मामिनावर त्यांना सोडून देण्यात आले. वनपाल के.जी. गायकवाड, एस.एन.जाधव, पिंपळगावचे वनरक्षक एन.के.चुकलवार, साईदास पवार, दुर्गा ढाळके, के.के.मरस्कोल्हे, मीरा टोम्पे व वनमजूर शेख अफसर यांच पथकात समावेश होता. 

तस्कारीमध्ये महिलांही पुढे 
सागवान तस्करीमध्ये विविध पुरुषांच्या विरोधात वन अधिनयमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सागवान तस्करीमध्ये महिलांचे तुरळक प्रमाण दिसून येत असले तरी या कारवाईमुळे किनवट तालुक्यात सागवान तस्करीमध्ये महिलांही पुरुषांच्या पुढे असल्याचे दिसून येत आहे. वन विभाग व वनमंडळ विभगाच्या विविध परिक्षेत्रातील वनसंपदेवर ट्रॅप कॅमेऱ्यांची नजर असल्याने तस्कारी बाबत तात्काळ कारवाई करण्यात येत असल्याचे वनमंडळचे वनपाल के. जी. गायकवाड यांनी सांगीतले. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com