नासिकच्या संघाने सुवर्णपदकाला केले काबीज 

शिवचरण वावळे
शनिवार, 4 जानेवारी 2020

नांदेड येथे श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी स्पर्धा 

नांदेड : मागील एका आठवड्याभरापासून शहरात सुरू असलेल्या ४७ व्या अखिल भारतीय श्री गुरू गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना पाचविरुद्ध दोन असा जिंकून आर्टलरी नाशिक हॉकी संघाने शुक्रवारी (ता.तीन) अजिंक्यपद पटकावले. स्पर्धेत संघर्षपूर्ण खेळ करणाऱ्या कर्नाल हरियाणा हॉकी संघाला मात्र उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले.  
गुरुवार (ता.दोन) श्री गुरु गोबिंदसिंघजी यांच्या ३५३ व्या प्रकाशपर्वाला समर्पित स्पर्धे अंतर्गत सामना सकाळी ११ वाजता होणारा सामना पावसाच्या व्यत्यय आल्याने दुपारी तीन वाजता खालसा हायस्कुल मिनी स्टेडियम मैदानावर आर्टलरी नाशिक विरुद्ध कर्नाल हॉकी संघ (हरियाणा) अशी सामान्याची सुरुवात झाली.  

नासिकच्या संघाने सोडली नाही एकही संधी
दोन्ही संघानी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करण्यास सुरु केले. नासिक संघाने सुरुवातीच्या पहिल्याच मिनिटाला गोल करून आघाडी निर्माण केली. त्यापाठोपाठ चरणजितसिंघ याने नाशिक संघासाठी चौथ्याच मिनिटाला पेनल्टी शूट मध्ये दुसरा गोल केला. प्रत्युत्तरात कर्नाल हरियाणाच्या संघाने ११ व्या मिनिटाला गोल केला. पण नाशिक संघाने पुन्हा आक्रमक खेळ करत एका पाठोपाठ सलग तीन गोल केले. त्यामुळे आघाडी मिळवत गोल पाच वर नेले. प्रतिस्पर्धी संघ चार गोलाने पिछाडीवर गेला. दोन्ही संघाने शेवटपर्यंत संघर्षपूर्ण खेळ केला. यात नाशिक संघ विजेता ठरला.

हेही वाचा...या’ प्रकरणातील विसावा आरोपी अटक

एक लाखाचे बक्षिस  
गुरुद्वारा नानकझीरा साहेब बिदरचे अध्यक्ष बलबीरसिंघ यांच्या हस्ते विजेता ‘आर्टलरी नाशिक’च्या हॉकी संघाला एक लाख रोख आणि गोल्ड व सिल्वर ट्रॉफी प्रदान करण्यात आली. या वेळी आमदार मोहन हंबर्डे, लंगर साहेबचे बाबा मोरसिंघ, महापालिकेचे सभागृह नेते वीरेंद्रसिंघ गाडीवाले, गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रविंदर सिंघ बुंगाई, मनपा स्थायी समितीचे सभापती अमितसिंह तेहरा, मनपा  सभापती प्रकाशकौर खालसा, गुरुद्वारा बोर्डाचे सदस्य गुरुचरणसिंघ घाडीसाज, मनप्रीतसिंघ कुंजीवाले, भागिन्दर सिंघ घाडीसाज, वरियमसिंग नवाब, इंदरसिंघ शाहू, सुखविंदरसिंग हुंदल, नानकसिंघ घाडीसाज, नारायणसिंघ नंबरदार, बाफना मोटर्सचे व्यवस्थापक गुरमितसिंघ रागी, गुरमीत सिंघ नवाब यांची उपस्थिती होती. 

हेही वाचा...बारदाना शिवणारा निघाला व्यापाऱ्याचा अपहरणकर्ता

या संघाला मिळाले विभागुन बक्षिस
दुसरा पारितोषिक कर्नाल हरियाणा संघाला रोख ४१ हजार असा प्रदान करण्यात आले. तर तिसऱ्या स्थानासाठी बी.ई.जी.पुणे आणि हॉकी नागपूर संघात विभागून देण्यात आले. गुरमितसिंघ नवाब अध्यक्ष, हरविंदरसिंघ कपूर, महेंद्रसिंघ लांगरी, जितेंदरसिंघ खैरा, हरप्रीतसिंघ लांगरी, संदीपसींग अखबारवाले, जसपालसिंघ कालों, जसबीरसिंघ चिमा, महेंद्रसिंघ गाडीवाले, अमरदीपसिंघ महाजन, डॉ. जुझारसिंग शिलेदार, विजयकुमार नंदे, जोगिंदरसिंग सरदार, मनमीतसिंघ शिलेदार, स. खेमसिंघ पोलीस, रविंदरसिंघ मोदी, विजयकुमार बी.पी.एड. कॉलेज यांनी मोलाची कामगिरी पार पाडली. 

स्पर्धेतील सहभागी संघ
पूल ए मध्ये बी. इ. जी. पुणे, हॉकी संघ अमरावती, एस. ए. जी. गांधीनगर,  पूल बी. मध्ये एस. इ. सी. रेल्वे नागपूर, पूल सी - मुंबई कस्टम, मुंबई रिपब्लिकन, हॉकी नागपूर. डी. ग्रुप जरखा हॉकी अकादमी, कोल्हापूर पोलिस आणि ए. सी. गार्ड हॉकी संघ. प्री क्वाटर फायनलमध्ये सरळ प्रवेश मिळवणाऱ्या मागील वर्षीच्या विजेत्या चार संघात ए. एस. सी. बंगळूर, हॉकी नांदेड (ए), आर्टिलरी नासिक आणि हॉकी कर्नाल हरियाणा संघ सहभागी झाले होते. 

असे होते वैयक्तिक पारितोषिक  
बेस्ट गोलकिपर - सुनील कुमार (नागपूर) संघ 
बेस्ट हॉफ  - चरणजितसिंघ, आर्टलरी नाशिक संघ 
बेस्ट फॉरवर्ड - अजित शिंदे , बी.ई.जी. पुणे संघ
बेस्ट फुल बॅक - नरिंदर यादव , कर्नाल हरियाणा संघ 
आणि प्लेअर ऑफ दि टुर्नामेंट - राजा पवार, हॉकी संघ नागपूर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nashik team clinches gold medal