देवणी : बदलत्या स्थितीत जमिनीचे आरोग्य जपण्याकडे नियमित दुर्लक्ष झाल्याने पोत घसरत असून त्यातून विविध रोगांचा प्रादुर्भाव अन् उत्पादकतेत घटच होत असल्याची स्थिती आहे. मृदेची वाढती झीज भविष्यातील अन्नधान्य उत्पादनासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे..कीडनाशक, बुरशीनाशक, तणनाशकासह रासायनिक खताचा उत्पादनवाढीसाठी होत असलेला अतिरेकी वापर तर शेणखत, सेंद्रीय खत, हिरवळीच्या खताच्या वापरातील सातत्याने घट , उसासारख्या जास्त पाणी लागणाऱ्या पिकांच्या क्षेत्रात होणारी वाढ यातून जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे..माती परीक्षणाकडे शेतकऱ्यांचे होत असलेले दुर्लक्ष अन् त्यातून उत्पादन वाढीसाठी रासायनिक खताचा अनावश्यक होणारा मारा यामुळे उत्पादन वाढीऐवजी जमिनीच्या आरोग्यात घटच होत आहे.वाढते शहरीकरण, वाढत्या जंगलतोडीतून होत असलेली मृदेची झीज भविष्यात अन्नधान्य उत्पादनासाठी अडचणीची ठरणार आहे..बदलत्या जीवनशैलीचा परिणाम, त्यातून होत असलेली पर्यावरणाची हानी यामुळे जमिनीची प्रत, कमी होत असलेले मातीतील सूक्ष्म अन्नघटक यामुळे अनेक भागातील जमिनीवर पीक घेणेही कठीण बनत चालले आहे. शेतकऱ्यांसोबत नागरिकांनीही मृदेसंदर्भात जागरूक राहणे आवश्यक आहे. सिंचनाखालील जमिनीचे क्षेत्र वाढवणे गरजेचे आहे, मात्र त्यातून जमीन क्षारपाड होता कामा नये याचीही काळजी घेणे आवश्यक आहे..सेंद्रीय शेती करणे गरजेचे आहे. ग्लाईफोसेटसारख्या घातक तणनाशकांचा होत असलेला नियमित व मोठ्या प्रमाणातील वापर यामुळे जमिनी नापीक बनत चालल्या आहेत. जमिनीवर मातीचा थर राहून उपयोगी नाही तर तो थर पीक घेण्यायोग्य व जिवंत असणे गरजेचे आहे. वर्षानुवर्षे जमिनी अन्न तयार करण्यासाठी सक्षम व सुपीक ठेवणे गरजेचे आहे.तज्ज्ञ डॉ. विजय भामरे यांनी मृदा संरक्षणासाठी सांगितलेले उपायरासायनिक खतांचा मर्यादित व शिफारशीनुसारच वापरनियमित पीक फेरपालट करणेमळी, शेणखत, भुईमूग पेंड, कंपोस्ट खंत याचा शेतीमध्ये वापरवाढवणेसूक्ष्म सिंचन व्यवस्थेचा अधिक वापर शेतीमध्ये करणेसर्वच स्तरावर जागरूकता आवश्यक.माती हा जीवनाचा मूळ घटक आहे. तिचे संरक्षण संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे. त्यासाठी पीक फेरपालट, खत व्यवस्थापन, वृक्षारोपण याबरोबरच सर्वच स्तरावर जागरूकता निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी योग्य शासकीय धोरण आखणे गरजेचे असून शालेय स्तरापासून विद्यार्थ्यांना यासंदर्भात शिक्षण देणे आवश्यक आहे. सर्वांनी मातीचे संरक्षण करण्यासाठी सकारात्मक पावले उचलल्यास नक्कीच आगामी आव्हानांना तोंड देणे शक्य होणार आहे..Khandoba Yatra : खंडेरायाच्या यात्रेसाठी कारीनगरी सजली; देवाची कथा राज्यातील खंडोबांपेक्षा वेगळी भाविकांत उत्साह .वाढत्या लोकसंख्येची भूक भागवण्यासाठी अन्नधान्य उत्पादनात सतत वाढच होणे गरजेचे आहे. वाढत्या शहरीकरणातून जमिनीचे क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे कमी जमिनीतून अधिकचे उत्पादन घेण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. जमिनीचा पोत घटत असल्यामुळे जमिनी या मृत, क्षारपाड होत आहे. हळूहळू नैसर्गिक शेतीकडे वळावे लागणार आहे. जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्य, सूक्ष्म जीव जिवंत कसे राहतील यासाठी शेतकरी, शेती अभ्यासकांना आगामी काळात टोकाचे प्रयत्न करावे लागणार आहेत.- मिलिंद बिडबाग, कृषी विभाग लातूर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.