

Police Issue High Alert on Solapur–Dhule National Highway 52
Sakal
येरमाळा : सोलापुर धुळे राष्ट्रीय महामार्ग ५२ वरील बीड ते तुळजापूर दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी धाराशिव बीड जिल्हा पोलीस आणि महामार्ग सुरक्षा पथकाकडून अत्यंत महत्त्वाचे आवाहन करण्यात येत आहे.या मार्गावरील धोकादायक ठिकाणी चोरी,लुटमार आणि दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.अशी ठिकाणे वाहतुकीच्या दृष्टीने हॉटस्पॉट, धोकादायक म्हणुन घोषित करण्यात आली आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्र.५२ सोलापुर धुळे महामार्गावर बीड ते तुळजापूर १३० किमी अंतरात वाहनलूटीचे प्रकारामुळे अशी धोकादायक दहा ठिकाणे (Hotspots) घोषित केले आहेत.वाहनधारकांनी या ठिकाणी विशेष काळजी घ्यावे असे जिल्हा, वाहतूक पोलीस शाखेने घोषित केले आहे.