esakal | सोलापूर माकणी रोड भीषण अपघात; मोटारसायकल वरील महिला जागीच ठार । Accident
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर-माकणी रोडवर भीषण अपघात; महिला जागीच ठार

सोलापूर-माकणी रोडवर भीषण अपघात; महिला जागीच ठार

sakal_logo
By
सुधीर कोरे

जेवळी : एसटी बस व मोटार सायकलचा झालेल्या अपघात मोटरसायकलवरील महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता.१) रात्री पावणे आठच्या सुमारास हिप्परगा सय्यद (ता लोहारा) येथे घडली आहे.  याबाबत माहिती अशी की, सोलापूर- माकणी ही एसटी बस ( क्र. एम एच २० बी एल- १५१२) ही सोलापूरहून माकणीकडे जात असताना शुक्रवारी (ता.१) रात्री पावणे आठच्या सुमारास हिप्परगा सय्यद (ता लोहारा) गावाजवळ जिल्हा परिषद शाळेसमोर तोंरबा गावावरुन जेवळीकडे येणाऱ्या मोटार सायकलला (क्र. एम एच ०५ सी ई ८९०५) चिरडल्याने यात मोटार सायकल वरील महिला इंदूबाई तुळशीराम कोरे (वय ४५) या जागीच ठार झाल्या आहेत.

हेही वाचा: संकेश्वर : चालत्या बसमध्ये प्रेमप्रकरणातून हल्ल्यात विवाहिता गंभीर

यावेळी मोटारसायकल चालक हा बाजूला पडल्याने किरकोळ जखमी झाला आहे. अपघातावेळी या परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होती. यामुळे मोटारसायकल स्वाराला समोरून भरधाव येणाऱ्या एसटीचा अंदाज आला नाही त्यातच चिखलामुळे मोटर सायकल घसरल्याने ती महिला एसटीच्या चाकात पडली यावेळी एसटीचे चाके शरीरावरून गेल्याने महिलेच्या शरीराचे चेंदामेंदा झाला. इंदूबाई ही बहिणीच्या मुलाबरोबर जेवळी येथे आपल्या बहिणीकडे येत होती. जेवळी अगदी दोन किलोमीटर अंतरावर उरले असतानाच असा काळाने घाला घातला

loading image
go to top