esakal | संकेश्वर : चालत्या बसमध्ये प्रेमप्रकरणातून हल्ल्यात विवाहिता गंभीर । Love
sakal

बोलून बातमी शोधा

संकेश्वर : चालत्या बसमध्ये प्रेमप्रकरणातून हल्ल्यात विवाहिता गंभीर

संकेश्वर : चालत्या बसमध्ये प्रेमप्रकरणातून हल्ल्यात विवाहिता गंभीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संकेश्वर : येथील आगाराच्या संकेश्वर-बाड बसमध्ये बाड येथील विवाहितेवर शुक्रवारी (ता. १) सायंकाळी पाच वाजता चाकुने प्राणघातक हल्ला झाला. त्यात विवाहिता गंभीर जखमी झाली. तिला उपचारार्थ बेळगाव सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी प्रवीण सातप्पा कांबळे (वय 21, रा. मांगनूर, ता. चिक्कोडी) याला संकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. त्याने गुन्हा कबुल केला आहे. प्रेमप्रकरणातून ही घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: पूर नियंत्रणासाठी औरंगाबादला मिळणार १४ कोटी

याबाबत अधिक माहिती अशी, जखमी महिला ही बाड येथील रहिवासी आहे. कणगला येथील एचएलएल कंपनीत ती दररोज कामाला जाते. आरोपीने पाळत ठेऊन हा हल्ला केला. जखमी महिलेला दोन मुले आहेत. घटनेची नोंद संकेश्वर पोलिसात झाली आहे. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक गणपती कोग्गेनहळ्ळी व हवालदार जंबगी यांनी भेट देऊन पंचनामा केला. पुढील तपास करण्यात येत आहे.

loading image
go to top