परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांची अंधार यात्रेतून सुटका...

परभणी जिल्ह्यात सौर कृषिपंप योजना
परभणी जिल्ह्यात सौर कृषिपंप योजना

परभणी - शेतकऱ्यांना सौर ऊर्जेव्दारे दिवसाही वीजपुरवठा उपलब्ध करून शाश्वत शेतीची स्वप्नपुर्ती करून देणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सौरकृषीपंप वीज जोडणीचे काम प्रगतीपथावर असून परभणी जिल्ह्यातील एक हजार ९२५ शेतकऱ्यांना सौर कृषीपंपाव्दारे प्रत्यक्ष वीज जोडणी देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांची अंधार यात्रेतून सुटका होऊन दिवसा विजेचे स्वप्न पुर्णत्वास आल्याची भावना लाभार्थी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत उपलब्ध आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी कृषिपंपांसाठी वीजजोडणी घेतली नाही किंवा वीजजोडणीचे पैसे भरूनही त्यांची वीजजोडणी प्रलंबित आहे, अशा शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत प्राधान्य देण्यात आले आहे. 

सौर कृषीपंपाव्दारे वीज जोडणी 
जिल्ह्यासाठी चार हजार ४२८ सौरकृषीपंप स्थापित करण्याचे निर्धारीत लक्ष्य असून मंजूर अर्जापैकी पाच हजार ३७६ शेतकऱ्यांना कोटेशन देण्यात आले आहेत. त्यापैकी तीन हजार ९०७ शेतकऱ्यांनी आपल्या हिश्याची रक्कम भरलेली आहे. यातील रक्कम भरलेल्या तीन हजार ८४३ शेतकऱ्यांनी एजन्सीची निवड केली असून एक हजार ९२५ शेतकऱ्यांना सौर कृषीपंपाव्दारे वीज जोडणी दिली आहे.

सौर पंपासाठी शेतकऱ्यांची मागणी 
मागील वर्षाच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि कोरोना संसर्गाच्या काळात वाहतुकीस मर्यादा आल्यामुळे काम पूर्ण करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर तसेच नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता संतोष वहाणे, परभणी मंडळाचे अधीक्षक अभियंता प्रविण अन्नछत्रे यांनी एजन्सीनिहाय आढावा घेवून लवकरात लवकर उर्वरीत शेतकऱ्यांना सौर कृषीपंपाव्दारे वीज जोडणी देण्याच्या सुचना केल्या आहेत. त्यानुसार सर्व एजन्सी कामाला लागल्या असून उर्वरीत शेतकऱ्यांचे शाश्वत सिंचनाचे स्वप्न पुर्णत्वास येणार आहे. या जिल्ह्यात सौर पंपासाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मागणी आहे. मागणी प्रमाणे व शासनाच्या नियमानुसार सदरील शेतकऱ्याला त्या योजनेचा फायदा दिला जात आहे.

शेतकऱ्यांचे शाश्वत वीजचे स्वप्न्‍ा पूर्णत्वास 
शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे सोयीचे व्हावे व पारंपरिक पध्दतीने कृषीपंपासाठी लागणाऱ्या खर्चात बचत व्हावी, या उद्देशाने परभणी जिल्ह्यातील कृषी वापरासाठी पारेषणविरहीत चार हजार ४२८ सौर कृषिपंप स्थापित करण्याचे निर्धारीत लक्ष्य आहे. त्या अनुषंगाने सौरपंप उभारण्याचे काम ही प्रगतीपथावर आहे. या योजनेमुळे अपारंपारिक ऊर्जेचा वापर वाढवण्यास मदत होईल त्याचबरोबर शेतकऱ्यांचे शाश्वत वीजचे स्वप्न्‍ा पूर्णत्वास येणार आहे.
- प्रवीण अन्नछत्रे, अधिक्षक अभियंता, परभणी.

संपादन - अभय कुळकजाईकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com