
गणेश फदाट यांना मुळातच देशसेवेची आवड असल्याने त्यांनी सैन्यादलातील सेवा पूर्ण केल्यानंतरही परत सैन्यदलास विनंती करून सेवाकाल वाढवून घेतला होता.
जाफराबाद (जि.जालना) : तालुक्यातील बोरगाव बुद्रूक येथील सैन्य दलातील नायब सुभेदार गणेश श्रीराम फदाट (वय ४१) हे कर्तव्य बजावत असताना ह्रदयविकाराचे तीव्र झटक्याने गुरुवारी (ता.२१) सकाळी सव्वा वाजेच्या सुमारास निधन झाले. ते कमांड हॉस्पिटल सिकंदराबाद येथे कर्तव्यावर असतांना विरमरण आले. त्यांचे पार्थिव विमानाने औरंगाबाद येथे येणार असून शुक्रवारी (ता.२२) सकाळी ११ वाजता बोरगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतला पडली 'बारा' मते... मग पठ्ठ्याने बॅनर लावून मानले मतदारांचे 'जाहीर आभार'
या घटनेमुळे बोरगावसह तालुक्यावर शोककला पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गणेश फदाट यांचा लहान भाऊ दिनेश फदाट हा देखील सैन्यदलात कार्यरत आहे. गणेश फदाट यांना मुळातच देशसेवेची आवड असल्याने त्यांनी सैन्यादलातील सेवा पूर्ण केल्यानंतरही परत सैन्यदलास विनंती करून सेवाकाल वाढवून घेतला होता. अशातच नायब सुभेदारपदाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
संपादन - गणेश पिटेकर