Accident News: सुटीवर आलेल्या सैन्यदलातील जवान अमोल पंडित दळवी यांचा भोकरदन-जालना मार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. दुचाकीला ट्रकची धडक बसून ही दुर्घटना घडली असून अंत्यसंस्कार शासकीय इतमामात पार पडले.
भोकरदन (जि. जालना) : सुटीवर आलेल्या सैन्यदलातील जवानाचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना भोकरदन-जालना मार्गावरील सोयगाव देवी पाटीजवळ गुरुवारी (ता. ७) रात्री उशिरा घडली. अमोल पंडित दळवी (वय ३५) असे त्यांचे नाव आहे.