esakal | काही शिक्षकांवर कारवाई, काहींना अभय
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

शिक्षण विभागाच्या बदली प्रक्रियेतील घोळ 

काही शिक्षकांवर कारवाई, काहींना अभय

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद ः जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होऊनही काही अधिकारी अशा प्रकाराला खतपाणी घालत असल्याचे उघडकीस आले आहे. काही ठराविक शिक्षकांवर कारवाई करायची अन्‌ काहींना चिरीमिरी घेऊन सोडून द्यायचे, असे प्रकार घडत असल्याने अशा प्रकारांकडे कोण डोळेझाक करत आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

 
ग्रामीण भागातील मुलांची गुणवत्ता वाढवून त्यांच्यात आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्यास प्रवृत्त करण्याचे काम शिक्षक वर्गातून केले जाते. मात्र, यातील काही शिक्षक यास अपवाद ठरत आहेत. शासनाच्या सेवेत असेलेल्या गुरुजींना विविध सेवासुविधा दिल्या जाताहेत. यामध्ये त्यांना बदलीचा अधिकार देण्यात आला आहे. पती-पत्नी सेवेत असतील तर त्यांना 30 किलोमीटर अंतरामध्ये नोकरी करण्याची संधी दिली जाते. मात्र, नैतिकतेचे धडे देणारे काही गुरुजीच नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे बदली प्रक्रियेत दिसत आहे. शिक्षण विभागात काम करणारे काही अधिकारी आणि कर्मचारीही यामध्ये समाविष्ठ असल्याचे दिसून येत आहे.

चिकुंद्रा (ता. तुळजापूर) येथे एका शिक्षकाची मूळ आस्थापना आहे. या शिक्षकाने तुळजापूर तहसील कार्यालयात डेप्युटेशन (प्रतिनियुक्ती) करून घेतले आहे. बदली प्रक्रियेमध्ये याने मूळ आस्थापना ज्या ठिकाणी आहे, त्याच ठिकाणची दाखविणे अपेक्षित होते. मात्र, बदली प्रक्रियेत गडबड केली. आपण, तुळजापूर येथेच काम करीत असल्याचे दाखविले. त्यावरून संबंधित शिक्षकाच्या पत्नीने बेंबळी (ता. उस्मानाबाद) येथे बदली करून घेतली आहे. मुळात चिकुंद्रा ते बेंबळी हे अंतर 30 किलोमीटरमध्ये बसत नाही. त्यामुळे या शिक्षकाने आपली मूळ आस्थापना तुळजापूर असल्याचे दाखविले आहे. 

कोणाचा आशिर्वाद? 
चुकीच्या पद्धतीने बदली प्रक्रियेचा लाभ घेतल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे आल्या होत्या. त्यानंतर यातील काही शिक्षकांना सुनावणीसाठी बोलावले. त्यामध्ये संबंधित शिक्षकाचा समावेश होता. तरीही त्याच्यावर कारवाई झाली नाही. मात्र, उर्वरित अनेक शिक्षकांवर कारवाई झाली. गेल्या वर्षीही काही शिक्षकांची एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद केली. तर, काहींना अभय मिळाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना कोणाचा आशीर्वाद आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. 


मूळ आस्थापना ही चिकुंद्रा येथील दाखविणे अपेक्षित आहे. हा प्रकार चुकीचा झालेला दिसत आहे. मी याबाबत माहिती घेऊन तुम्हाला सांगते. 
- सविता भोसले, शिक्षणाधिकारी. 

loading image
go to top