पारध - वडिलांच्या नावावर शिल्लक असलेली एक एकर शेत जमीन आमच्या नावावर करून द्या. या मागणीसाठी जन्मदात्या पित्यालाच मुलगा व सुनेने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देऊन घरातून हाकलून दिल्याची घटना बुधवारी (ता. 5) अवघडराव सावंगी (ता. भोकरदन) येथे उघडकीस आली. असून, याप्रकरणी पारध पोलिसांनी मुलगा, सुनेविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.