पित्याच्या खूनप्रकरणी मुलासह मित्राला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

पित्याच्या खूनप्रकरणी मुलासह मित्राला अटक

लातूर - दारू पिऊन घरी मारहाण करणाऱ्या वडिलांचा मुलाने मित्राच्या साहाय्याने खून केल्याची घटना चिंचोली बल्लाळनाथ येथे उघडकीस आली आहे. गातेगाव पोलिसांनी दोघांना अटक केली.

चिंचोली बल्लाळनाथ येथील नागनाथ खंडू काळे यांना दारूचे व्यसन होते. दारू पिल्यानंतर ते पत्नी, मुलाला मारहाण करीत. यावरून नागनाथ काळे व त्यांचा मुलगा आकाश यांच्यात नेहमी भांडणे होत. सततच्या या त्रासाला कंटाळून आकाश काळेने मित्र रोहित रघुनाथ पोपळे यास वडिलांना मारण्यासाठी वीस हजार रुपये देण्याचे कबूल केले. ३० जुलैला रात्री वडील नागनाथ काळे हे घरी एकटेच असताना या दोघांनी त्यांच्या गळ्यावर कोयत्याने वार करून करून ठार मारले.

त्यानंतर दोघे बसस्थानकावर गेले. तेथून रोहित पोपळे निघून गेला. आकाश काळे पुन्हा घरी आला व वडील मरण पावल्याची खात्री केल्याचे पोलिस तपासात पुढे आले. या प्रकरणी गातेगाव पोलिस ठाण्यात पहिल्यांदा अकस्मात मृत्यू म्हणून गुन्हा नोंद झाला होता. नंतर तपासात आकाश काळे याने मित्र रोहित पोपळे याच्या साहाय्यानेच हा खून केल्याचे उघड झाले. या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद करून दोघांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना पाच ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती गातेगावचे सहायक पोलिस निरीक्षक अशोक घारगे यांनी दिली.

Web Title: Son And Friend Arrested In Fathers Murder Case Latur Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..