esakal | स्वप्निलने केले वडिलांना यकृताचे दान; परभणीतील आधुनिक श्रावणबाळ
sakal

बोलून बातमी शोधा

parbhani

आजारी वडिलांना स्वतःचे यकृत दान करून त्यांचा जीव वाचविण्याचा धाडसी निर्णय परभणीतील एका २५ वर्षीय युवकाने घेतला

स्वप्निलने केले वडिलांना यकृताचे दान; परभणीतील आधुनिक श्रावणबाळ

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी: लग्न झाल्यानंतर सुखी संसाराची स्वप्ने पाहणारे अनेक तरूण आपण समाजात वावरताना पाहतो. परंतू लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच आजारी वडिलांना स्वतःचे यकृत दान करून त्यांचा जीव वाचविण्याचा धाडसी निर्णय परभणीतील एका २५ वर्षीय युवकाने घेतला. स्वप्नील राजकुमार रुद्रवार असे या आधुनिक श्रावण बाळाचे नाव आहे. परभणीतील क्रांती चौक परिसरात साई बुक सेंटर या नावाने पुस्तके विक्रीचे दुकान आहे. येथील व्यापारी राजकुमार रुद्रवार हे या दुकानाचे मालक आहेत. डिसेंबर २०२० मध्ये रुद्रवार यांना शारीरिक थकवा जाणवत असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत त्यांचे यकृत निकामी झाल्याचे स्पष्ट झाले.

राजकुमार रुद्रवार यांच्या तपासणीचा अहवाल रुद्रवार कुटूंबासाठी धक्कादायक होता. परभणीतील तज्ञ डॉक्टरांनी राजकुमार रुद्रवार यांचे यकृत तातडीने बदलावे लागणार असल्याचे सांगून शस्त्रक्रियेसाठी हैदराबाद येथे जाण्याचा सल्ला दिला. परंतू घरात मुलीचे लग्न कार्य ठरलेले होते. त्यामुळे मुलीचे लग्न झाले की, राजकुमार रुद्रवार यांच्यावर हैदराबाद शस्त्रक्रिया करण्याचे ठरले.

हेही वाचा: Aundha Nagnath: शेवटच्या श्रावण सोमवारी आमदार बांगर यांच्या हस्ते महापुजा

स्वप्निलने केले धाडस आणि राजकुमार यांचे वाचले प्राण-

हैदराबाद येथे शस्त्रक्रियेसाठी गेल्यानंतर यकृत उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे यकृत उपलब्ध होण्याची वाट पहात बसण्यापेक्षा स्वप्निल रुद्रवारने धाडसी निर्णय घेऊन स्वत:चे यकृत दान देण्याचे ठरविले. या निर्णयाला स्वप्निलच्या पत्नीने व त्याच्या सासू-सासऱ्यांनी मानसिक तर मामा व आत्याने आर्थिक पाठबळ दिले. त्यानंतर स्वप्निलने स्वतःचे यकृत त्याचे वडील राजकुमार रुद्रवार यांना दान दिले. जानेवारी २०२१ मध्ये ही शस्त्रक्रिया पार पडली. दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर स्वप्निल रुद्रवार याने त्यांचे शालेय पुस्तके विक्रीचे दुकान पुन्हा सुरु केले. आजच्या काळात आई वडिलांचा सांभाळ करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पिढिच्या डोळ्यात स्वप्निलचा निर्णय झणझणीत अंजन घालणारा ठरला आहे.

माझ्या आजी-आजोबांचे आमच्यावर चांगले संस्कार झाले आहेत. कितीही वाईट परिस्थितीत कुटूंब सोडायचे नाही हा मौलिक मंत्र त्यांनी दिला आहे. त्यामुळेच मी हा निर्णय घेऊ शकलो.

- स्वप्निल रुद्रवार, परभणी

loading image
go to top