Success Story: संसाराची जबाबदारी सांभाळत स्पर्धा परीक्षेद्वारे गाठले यशोशिखर ;कन्हेगावच्या सोनिया मोकासेंची पोलिस उपनिरीक्षक पदास गवसणी, वाशीम शहर ठाण्यात नियुक्ती

From Homemaker To Police Sub Inspector : संसाराची जबाबदारी, मुलीचे संगोपन आणि आर्थिक अडचणी सांभाळत सोनिया मोकासे यांनी एमपीएससी परीक्षेत यश मिळवले. कन्हेगावच्या या लेकीची वाशिम पोलिस दलातील उपनिरीक्षकपदापर्यंतची वाटचाल ग्रामीण मुलींसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
Sonia Mokase overcame family and financial challenges to become a police sub inspector

Sonia Mokase overcame family and financial challenges to become a police sub inspector

esakal

Updated on: 

सोमनाथ नागुरे

सोनपेठ, : संसाराची जबाबदारी, मुलींचा सांभाळ, आर्थिक अडचणींसह आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत ध्येयाचा पाठपुरावा करणाऱ्या सोनिया चंद्रकांत मोकासे यांनी जिद्द, चिकाटीच्या बळावर ‘एमपीएससी’ परीक्षेत यश मिळवत तालुक्यातील कन्हेगाव येथील या लेकीने पोलिस उपनिरीक्षकपदी मजल मारली. सध्या त्या वाशिम शहर पोलिस ठाण्यात कर्तव्य बजावत असून, त्यांचा संघर्षमय प्रवास ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी आहे.

Loading content, please wait...