Women harvesting soybean plants amidst the fallen leaves and debris.
sakal
शिवना - अल्पशा पावसावर पेरणी केली. त्यानंत स्प्रे करावा अशा स्वरूपात अवघ्या दोन चार वेळा पडलेल्या पावसात कशीबशी तग धरून उभी असलेली पिके यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत वाळली. शेंगांमधिल दानाच न भरल्याने पाळापाचोळ्यात उभ्या असलेल्या सोयाबीनच्या काड्या शोधून सोंगणी केल्यानंतर मळणी केली आणि सोयाबीनचे ज्वारी एवढे बारीक पडलेले दाणे पाहून शेतकऱ्यांच्या छातीत चर्रर्रर्र झालं.