esakal | सरकारच्या आयाती धोरणामुळे सोयाबीन उत्पादकांवर संकट
sakal

बोलून बातमी शोधा

सोयाबीन

सरकारच्या आयाती धोरणामुळे सोयाबीन उत्पादकांवर संकट

sakal_logo
By
आनंद खर्डेकर

परंडा (जि. उस्मानाबाद) : शेतकऱ्यांचे सोयाबीनचे पीक बाजारात येण्यापूर्वीच केंद्र सरकारने इतर सोयाकेकच्या आयातीचा निर्णय घेतला. त्यामुळे याचा परिणाम दरावर होणार असून, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा होईल अशी प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत.

हेही वाचा: उस्मानाबाद नगरपालिका निवडणुकीची लगबग सुरु,कार्यकर्त्यांची पळापळ

आर्थिक अडचणीवर मात करून मोठ्या कष्टाने पिकविलेला भाजीपाला भाव नसल्याने रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत. पावसाने गरजेच्या वेळी धोका दिल्याने खरिपाच्या उत्पादनावरही परिणाम होऊन याचा फटका शेतकऱ्याला बसला आहे.

पाऊस नसल्याने सर्वच प्रकल्पांनी तळ गाठला असून, पुढील उत्पादनाचीही शेतकऱ्यांना खात्री नाही. हिरवी मिरची, ढोबळी मिरची, काकडी, लिलावात दोन ते चार रुपये किलोने विकली जात आहे. लाल टोमॅटोला भावच नसल्याने उत्पादकांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले आहेत. निर्सगाच्या लहरीपणामुळे व कवडी मोल बाजारभावामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असतानाच सोयाबीन उत्पादकांनाही अडचणीत आणण्याची भूमिका केंद्र सरकारने घेतल्याचा आरोप शेतकरी करू लागले आहेत.

हेही वाचा: ‘थॅंक्स अ टिचर’ अभियान सोशल मीडियावर शब्दरूपी गुरुदक्षिणेचे

केंद्र सरकारने सोयाकेकच्या आयातीचा निर्णय घेतला. त्यामुळे सोयाबीनच्या दरात घसरण झाली. देशातील सोयाबीन बाजारात येणार तेव्हाच आयातीचा माल देशात येणार असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना याचा फटका बसणार आहे.

मागील वर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळाल्याने यावर्षी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. केंद्रसरकारने सोयाकेक आयात करण्याचा निर्णय घेताच दोन हजार रुपयांनी सोयाबीनचे भाव उतरले आहेत. कोरोनामुळे शेतीमाल मातीमोल भावात विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली असतानाच आयातीचा केद्र सरकारचा निर्णय शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा आहे. - शंकर घोगरे शेतकरी, कंडारी, ता. परंडा

loading image
go to top