
शाळा बंद असल्यातरी वाडी वस्त्या, तांडे, दुर्गम व शहरी भागातील शिक्षकांसोबत काही स्वयंसेवक, शिक्षक मित्र शिक्षण देण्याचे काम स्वयंस्फूर्तीने करू करीत आहेत.
देऊर ः प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याच्या जडणघडणीमध्ये शिक्षक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. ज्या शिक्षकांनी आपल्या आयुष्यात परिवर्तन आणले अशांचे आभार व्यक्त करण्यासाठी शासनाने ५ सप्टेंबर अर्थात शिक्षक दिनानिमित्त ‘थॅंक्स अ टिचर’ अभियान मोहीम सुरू केली आहे. यात १० सप्टेंबरपर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. अभियानांतर्गत आवडत्या शिक्षकांबद्दल भावना व्यक्त करण्याची संधी सर्वांना देण्यात आली आहे.
वाचा ः अनलॉकनंतर धुळे ‘मनपा’ची गती मंद; बांधकामाचे ८०० प्रस्ताव पेंडिंग
शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या आयुष्यात जे अमूलाग्र बदल झाले, जी प्रगती झाली ती शब्दरूपाने व्यक्त करण्यासाठी ‘थॅंक्स अ टिचर’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. शब्दरूपी गुरुदक्षिणा देण्यासाठी मिळालेले यश आपल्या शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे मिळाले, हे आपल्या शब्दांत व्यक्त करणे, हीच खरी गुरुदक्षिणा ठरणार आहे.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर यंदा शिक्षक दिन नेहमीप्रमाणे साजरा करता येणे शक्य नाही. या पार्श्वभूमीवर ५ सप्टेंबरला प्रत्येक व्यक्ती, विद्यार्थी, पालक, शिक्षक, अधिकारी, सर्व क्षेत्रातील मान्यवर व समाजातील सर्वांनाच आपल्या जीवनात ज्या व्यक्तीला गुरू मानतो त्यांच्याप्रती आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी ‘थॅंक्स अ टिचर’ अभियान आहे.
HAH, Facebook handle : Thxteacher,
Twitter : @thxteacher, Instagram : @thankuteacheri, या सोशल मीडियाद्वारे राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. यात समाजातील सर्व घटकांचा सहभाग आवश्यक आहे.
आवर्जून वाचा :पर्यावरणाचा स्वच्छतादुत संकटात ; सातपुड्यात केवळ २३ गिधाड
५ सप्टेंबरचा प्रस्तावित कृती कार्यक्रम
‘शाळा बंद, शिक्षण सुरू’ उपक्रम यशोगाथा सादरीकरण ः कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान या शैक्षणिक सत्रात शाळा बंद असल्या तरी विविध माध्यमांतून, उपक्रमांतून मुलांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या या उपक्रमांच्या यशोगाथांचे सादरीकरण केंद्रस्तर, तालुकास्तर, जिल्हास्तरावरून करण्यात येणार आहे.
कोरोना काळातील शिक्षणावर परिसंवाद
शाळा बंद असल्यातरी वाडी वस्त्या, तांडे, दुर्गम व शहरी भागातील शिक्षकांसोबत काही स्वयंसेवक, शिक्षक मित्र शिक्षण देण्याचे काम स्वयंस्फूर्तीने करू करीत आहेत. अशा व्यक्तींचे वेबिनार तालुका, जिल्ह्यात आयोजित करण्यात यावेत. यात शाळा व्यवस्थापन समिती व पालकांना सहभागी करून घ्यावे.
हे ही वाचा: खासगी बससाठी नियमावली; प्रत्येक फेरीनंतर बसचे निर्जंतुकीकरण
वक्तृत्व, निबंध, पोस्टर, घोषवाक्य, कविता, प्रेरणा व प्रबोधनात्मक गीतवाचन, नाट्यवाचन, अभिवाचन स्पर्धा ः शिक्षक दिनाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी विविध विषय देऊन ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा ,घोषवाक्य स्पर्धा, शब्द देऊन कविता तयार करणे, प्रेरणा व प्रबोधनात्मक गीतवाचन, नाट्यवाचन, अभिवाचन स्पर्धांचे आयोजन करणे.
शैक्षणिक रांगोळी, चित्रकला, सुशोभन स्पर्धा आयोजन ः शिक्षणाच्या प्रयोगशील शाळांचे सादरीकरण करणे. ‘माझे प्रेरक शिक्षक’ या विषयाला प्राधान्य देण्यात यावे. याद्वारे समाजातील उत्तम काम करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन मिळेल. या उपक्रमातून विद्यार्थी, पालक व अधिकाऱ्यांना त्यांच्या शिक्षकांचे आभार मानण्याची ज्यांच्यामुळे ते आज विविध पदावर कार्यरत आहेत, त्या शिक्षकांचे आभार मानण्याची एक संधी आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे