Soybean Procurement : हमीभावातील सोयाबीन खरेदीला वेग काही येईना; नोंदणीकृत केवळ ३ हजार २८ शेतकऱ्यांकडूनच खरेदी

Dharashiv : धाराशिव जिल्ह्यात हमीभाव खरेदी केंद्रांवर १९ हजार ८६४ शेतकऱ्यांची नोंदणी, आतापर्यंत ३ हजार २८ शेतकऱ्यांकडून ६७ हजार क्विंटल सोयाबीन खरेदी.
Soybean Procurement
Soybean Procurementsakal
Updated on

धाराशिव : जिल्ह्यातील २१ हमीभाव खरेदी केंद्रांत सोयाबीन विक्रीसाठी १९ हजार ८६४ शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे. त्यापैकी आतापर्यंत ३ हजार २८ शेतकऱ्यांकडून ६७ हजार ६२३ क्विंटल सोयाबीनची खरेदी केली आहे. तसेच, आतापर्यंत १ हजार १७४ शेतकऱ्यांना त्यांच्या १८ हजार २३० क्विंटल सोयाबीनच्या विक्रीपोटी ८ कोटी ९१ लाख ८१ हजार १६० रुपये देण्यात आले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com