aasef beg death in accident
sakal
पाचोड - बीडहून भंगार घेऊन छत्रपती संभाजीनगरला भरधाव वेगात जाणाऱ्या आयशरने आपल्या समोरील ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिल्याने आयशर चालक गंभीर जखमी होऊन त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची दुर्घटना धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मुरमा (ता. पैठण) शिवारात सोमवारी (ता. २४) माध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली.