पाचोड - कुटुंबियांना भेटण्यासाठी सुटीवर आलेल्या जवानाच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव वेगातील ट्रकने जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू होऊन दोघे जण गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड (ता. पैठण)जवळ जामखेड फाटयावर शुक्रवारी (ता. २०) घडली असून शनिवारी (ता. २१) शोकाकूल वातावरणात मृत मायलेकीवर गोंदी (ता. अंबड) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.