choramba khandeshwar palkhi miravnuk
sakal
अर्धापूर - तालुक्यातील चोरंबा (ना.) येथील श्री खंडेश्वर देवस्थान जेजुरी प्रतिष्ठान यात्रेला रविवारी उत्साहात प्रारंभ झाला. सोमवारी (ता, ३०) श्री खंडेश्वराची पालखी मिरवणूक भक्तिभावात पार पडली. मंदिरातून निघालेली पालखी संपूर्ण गावातून काढण्यात आली असून, या मिरवणुकीला हजारो भाविकांची उपस्थिती लाभली.