एसआरपीएफ जवानाची गळफास घेऊन आत्महत्या,सुट्टीवर असताना उचलले टोकाचे पाऊल

जवान दिनेश मुलगीर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे.
SRPF Jawan Committed Suicide
SRPF Jawan Committed Suicideesakal

आखाडा बाळापूर (जि.हिंगोली) : कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथे सुट्टीवर आलेल्या एसआरपीएफ जवानाने राहत्या घरी शुक्रवारी (ता.२८) गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आखाडा बाळापुर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कळमनुरी (Kalamnuri) तालुक्यातील पोतरा येथील एसआरपीएफ जवान (SRPF Jawan) दिनेश बालासाहेब मुलगीर (वय ३२) हा गडचिरोली येथे राजाराम खंडाला या एसआरपीएफ डिव्हिजनमध्ये कार्यरत आहे. पाच दिवसांपूर्वी आपल्या पोतरा या गावी सुट्टीवर आला होता. परंतु कोणत्या तरी कारणाने त्याने शुक्रवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. (SRPF Jawan Hanged Himself In Kalamnuri Taluka Of Hingoli)

SRPF Jawan Committed Suicide
विधानपरिषदेच्या जागा कशा रिक्त राहू शकतात, अनिल परबांचा सवाल

दिनेश मुलगीर हा जवान विवाहित असून त्याला तीन अपत्य आहेत. त्याच्या आत्महत्येचे कारण सध्यातरी स्पष्ट झाले नसले तरीही सदरील जवान दिनेश मुलगीर ने कौटुंबिक कारणातून आत्महत्या केली असल्याची गाव परिसरात चर्चा आहे. दिनेश मुलगीर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुली असा परिवार असून आई वडील हे शेती करतात. तर दिनेश हा आई-वडिलांना एकुलता एक असल्याचे समजते. याबाबत आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये एसआरपीएफ जवान दिनेश मुलगीर याचे शवविच्छेदन करण्यात आले.(Hingoli)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com