Beed News : शाळेच्या छतावर मंडपात मराठीचा पेपर, बैठक व्यवस्थेचा बोजवारा; केंद्र प्रमुखांवर कारवाई

SSC Exam Beed : बीडमध्ये एका केंद्र प्रमुखाने चक्क मंडप उभारून काही विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करावी लागल्याचा प्रकार पहिल्याच मराठीच्या पेपरला घडला. या प्रकरणी केंद्र प्रमुखावर कारवाई करण्यात आली आहे.
Education Authorities Probe Beed Exam Incident

Education Authorities Probe Beed Exam Incident

Esakal

Updated on

दहावीच्या परीक्षेसाठीची केंद्र, तेथील व्यवस्थेची काही दिवस आधीच तयारी आणि आढावा घेतला जातो. असे असताना कुर्ला (ता. बीड) येथील केंद्र प्रमुखाने चक्क मंडप उभारून काही विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करावी लागल्याचा प्रकार पहिल्याच मराठीच्या पेपरला शुक्रवारी (ता. २०) घडला. उन्हाचा पारा वाढत असताना अशा व्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. याप्रकरणी मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुखाचे निलंबन करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रियाराणी पाटील यांनी संबंधीत शिक्षण संस्थेला दिले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com