esakal | SSC Result 2021: दहावीच्या दहा हजार विद्यार्थ्यांना बोनस गुण
sakal

बोलून बातमी शोधा

result

SSC Result 2021: दहावीच्या दहा हजार विद्यार्थ्यांना बोनस गुण

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी (ता. 16) जाहीर केलेल्या निकालात लातूर विभागातील तब्बल दहा हजार 350 विद्यार्थ्यांना बोनस गुणांचा लाभ देण्यात आला आहे. यात सर्वाधिक साडेपाच हजार विद्यार्थी एकट्या लातूर जिल्ह्यातील आहेत. कोरोनामुळे खेळाडू विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला तरी आठवी व नववीत क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बोनस गुणांचा लाभ देण्यात आला आहे. यात चित्रकला, लोककला व शास्त्रीय कला क्षेत्रातील गुणवंतांनी यंदाही बोनस गुण घेण्यात आघाडी कायम ठेवली आहे.
दहावी व बारावी परीक्षेत क्रीडा, चित्रकला, लोककला, शास्त्रीय कला, स्काऊट गाईड व एनसीसीमधील गुणवंत विद्यार्थ्यांना बोनस गुण देण्यात येतात. हे गुण विद्यार्थ्यांनी सर्व विषयात मिळवलेल्या एकुण गुणांमध्ये वाढवले जातात. यामुळे अनेक विद्यार्थ्यांची टक्केवारी शंभरच्या पुढे जाते.

क्रीडा स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेनुसार पाच ते 25 गुण देण्यात येतात. दहावीत शिकत असतानाच या स्पर्धेत सहभागी होण्याचे बंधन होते. मात्र, कोरोनामुळे यंदा क्रीडा स्पर्धा झाल्या नाहीत. बहुतांश स्पर्धा घेण्यावर मर्यादा आल्या. यामुळेच सरकारने आठवी व नववीमध्ये क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना खेळाचे बोनस गुण देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विभागात केवळ 962 विद्यार्थी खेळाच्या बोनस गुणाला पात्र ठरले आहेत.

हेही वाचा: लातुरात बांधावरील ५० चंदनाच्या झाडांची चोरी!

गेल्यावर्षी ही संख्या तीन हजार 230 होती. स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा चांगलीच वाढली असून तब्बल 252 विद्यार्थ्यांनी या क्षेत्रासाठी निश्चित तीन ते दहा बोनस गुणांचा लाभ घेतला आहे. गेल्यावर्षी केवळ 28 विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला होता. राष्ट्रीय छात्र सेनेत (एनसीसी) सहभागी विद्यार्थ्यांनाही पात्रतेनुसार तीन ते वीस गुण आहेत. मात्र, बहुतांश विद्यालयांसह एनसीसी विभागालाही याची माहिती नसल्याने यंदा तर एकाही विद्यार्थ्याला याचा लाभ मिळालेला नाही. गेल्यावर्षी नांदेड जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याला या क्षेत्राच्या बोनस गुणाचा लाभ मिळाला होता.

loading image