st bus accident
sakal
वाशी - एसटी बसचे ब्रेक अचानक फेल झाल्याने झालेल्या अपघातात चौघे जखमी, तर दोन दुचाकीचे नुकसान झाले आहे. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला असुन सोमवार (ता. १७) रोजी शहरातील मुख्य बाजारपेठेतील छञपती शिवाजी महाराज चौकात सकाळी साडे अकरा वाजणेच्या सुमारास हा अपघात घडला.